रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक : शिवसेनेचा भाजपला धोबीपछाड

Courtesy : Social Media

नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या पोट निवडणुकीत शिवसेनेचे प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी 1092 मतांनी विजयी झाले आहेत. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या लढतीत शिवसेनेने बाजी मारत भाजपला धोबीपछाड केलं. या निवडणुकीत शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांनी प्रचाराची धुरा एकहाती सांभाळत हा विजय मिळवला आहे.

भाजपने या निवडणुकीत सगळे दिग्ग्ज नेते उतरवून देखील काहीही फायदा झाला नाही. भाजपने या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, खासदार नारायण राणे, आमदार संजय केळकर, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, चित्रा वाघ असे दिगज्ज नेते या निवडणुकीत उतरवले होते. तसेच आमदार प्रसाद लाड या ठिकाणी आठ दिवस तळ ठोकून होते. मात्र, असं असून देखील भाजपला या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. रत्नागिरीत पुन्हा एकदा सामंत बंधूनी राबवलेला पॅटर्न यशस्वी झाला असून या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला धोबीपछाड करत विजय मिळवला.