Home > News Update > रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील पूरग्रस्तांना जिजाऊंचे मदतकार्य

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील पूरग्रस्तांना जिजाऊंचे मदतकार्य

जिजाऊ संस्थेचे 25 स्वयंसेवक व 4 रुग्णवाहिका, 5 टेम्पो पुढील काही दिवस मदत कार्यात सक्रिय

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील पूरग्रस्तांना जिजाऊंचे मदतकार्य
X

पालघर: मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेक गाव, शहर पाण्यामध्ये बुडाली, त्यामध्ये अनेक दुर्घटना घडल्या. या भयानक पुराचा मोठा फटका कोकणाला कोकणातील जनतेला बसला अनेकांना आपल्या कुटूंबातील सदस्यांना पुरामध्ये गमवावे लागले आहे या दुःखद प्रसंगी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेची टीम रत्नागिरी जिल्ह्यात पाठवली आहे व त्यांच्या सोबत 5 हजार अन्नधान्य किट, 10 हजार ब्लॅंकेट, 5 हजार बिस्लेरी बॉटल, औषधे, लहान बालकांसाठी बिस्कीटे, दूध पावडर व आदी जीवणाआवश्यक साहित्य पाठवले आहे. व पुढील काही दिवसांत हे सर्व साहित्य जिजाऊ टीम सर्व पूरग्रस्तांना वाटप करणार आहे.




संपूर्ण कोकण हे जिजाऊ संस्थेचे कुटूंब असल्यानें जे भीषण संकट कोकणावर ओढवले आहे ते दूर करण्यासाठी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून शक्य होईल तेवढी मदत आपल्या समाजबांधवांना वाचवण्यासाठी केली जाईल कारण कोकणातील प्रत्येक सदस्य हा जिजाऊ परिवाराचा भाग आहे आणि त्यांना मदत करणं हे कर्तव्य असल्याचं जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी म्हटले आहे.



चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिजाऊ संस्थेचे 25 स्वयंसेवक व 4 रुग्णवाहिका, 5 टेम्पो पुढील काही दिवस मदत कार्यात सक्रिय असल्याचं जिजाऊ संस्थेचे सचिव केदार चव्हाण यांनी सांगितले






Updated : 30 July 2021 11:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top