राष्ट्रवादी शिवसेनेला पाठींबा देणार ?
Max Maharashtra | 6 Nov 2019 12:27 PM IST
राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली वेगाने चालु आहे. मुख्यमंत्री कोण होणार चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे नेत्यांची भेटगाठ चालु आहे. आज संजय राउत यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे यांच्यात काय चर्चा होईल याकडे सर्वांच लक्ष लागुन होतं.
दोंघामध्ये जवळपास १० मिनिटे चर्चा झाली. नेहमीप्रमाणे ही सदिच्छा भेट होती असं संजय राउत यांनी सांगीतले. यावेळी संजय राउत म्हणाले की, राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. राज्यातील अस्थिर स्थितीवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केलीयं. राज्यात लवकरात लवकर सत्ता स्थापन व्हावी असं शरद पवारांना वाटतं. त्याचप्रमाणे जनतेनं राष्ट्रवादी – कॉँग्रेंसला विरोधात बसण्याचा कौल दिलायं त्यामुळे शिवसेनेला राष्ट्रवादी पाठींबा देणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Updated : 6 Nov 2019 12:27 PM IST
Tags: ajit pawar bjp Devendra Fadanavis Maharashtra Election Maharashtra Election 2019 news sharad pawar राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार शिवसेना शेतकरी
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire