Home > News Update > संयुक्त किसान मोर्चा व कामगार संघटना तसेच राजकिय पक्षांच्या वतीने अहमदनगर येथे रास्ता रोको

संयुक्त किसान मोर्चा व कामगार संघटना तसेच राजकिय पक्षांच्या वतीने अहमदनगर येथे रास्ता रोको

संयुक्त किसान मोर्चा व कामगार संघटना तसेच राजकिय पक्षांच्या वतीने अहमदनगर येथे रास्ता रोको
X

अहमदनगर : केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्याच्या विरोधात आज संयुक्त किसान मोर्चा व विविध कामगार संघटना तसेच राजकिय पक्षांनी 'भारत बंद' पुकारला आहे.त्या अनुषंगाने अहमदनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात बस स्थानकासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना अविनाश घुले म्हणाले की, केंद्र सरकारच्या वतीने जे काळे कायदे आणण्यात आले त्याची मागणी कोणीही केली नाही, बळजबरीने हे सर्व कायदे लादण्यात आले आहेत. हे सरकार केवळ आदानी अंबानीसाठी काम करणारे सरकार असल्याच्या आरोप यावेळी घुले यांनी केला.

दरम्यान यावेळी बोलताना अर्षद शेख म्हणाले की, काल परवा UN मध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, मी आधी चहा विकत होतो, आता जगाला काय करायचे की तुम्ही चहा विकत होतात की कॉफी? देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगासमोर काय बोलावे आणि काय नाही याची खंत वाटते असं शेख म्हणाले.दरम्यान, शेतकरी आंदोलना दरम्यान शहिद झालेल्या जवळपास 700 शेतकऱ्यांबाबत बोलायला देशातील कुणालाच वेळ नाही. याच दुःख वाटत असे ते म्हणाले.

यावेळी संयुक्त किसान मोर्चा, आयटक, अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत , बीडी कामगार संघटना या आंदोलनात सहभागी झाले होते. या रास्ता रोको वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Updated : 27 Sep 2021 6:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top