Home > News Update > राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने एकल महिलांची सहल....

राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने एकल महिलांची सहल....

व्हेलेंटाइन दिनाच्या निमित्ताने एकल महिलांची एक सहल राष्ट्र सेवा दल,मालवणी विभागाने, सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्या सहकार्याने आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी,मनोरी कॉर्नर रिसॉर्ट, मनोरी, मार्वे,मालाड येथे आयोजित केली होती. या सहलीला शंभरहून अधिक महिला,पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.या मध्ये 60 एकल महिला आपल्या मुलांना घेवून या सहलीत सहभागी झाल्या होत्या.

राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने एकल महिलांची सहल....
X

व्हेलेंटाइन दिनाच्या निमित्ताने एकल महिलांची एक सहल राष्ट्र सेवा दल,मालवणी विभागाने, सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्या सहकार्याने आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी,मनोरी कॉर्नर रिसॉर्ट, मनोरी, मार्वे,मालाड येथे आयोजित केली होती. या सहलीला शंभरहून अधिक महिला,पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.या मध्ये 60 एकल महिला आपल्या मुलांना घेवून या सहलीत सहभागी झाल्या होत्या. खेळ,गाणी, नृत्य,स्विमिंग पूल मध्ये डुंबणे याचा आनंद या महिलांनी घेतला.निसार अली सय्यद,वैशाली महाडिक,मेरी चेट्टी,मनोज परमार,नमिता मिश्रा,प्रदीप खरात, श्रीधर क्षीरसागर यांनी या साठी पुढाकार घेतला होता. जेवणा नंतरच्या सत्रात अनुभव शेअर आणि गप्पाचा कार्यक्रम झाला. यावेळी शरद कदम,श्रीधर क्षीरसागर,निसार अली यांनी महिलांना आपले अनुभव सांगून बोलते केले.



आपली लढाई स्वतःला लढावी लागेल,मुलांच्या शिक्षणावर आपल्याला भर द्यावा लागेल,ज्या महिलांना पुढे शिक्षण घ्यायचे आहे त्यांना रात्र शाळा आणि इतर शैक्षणिक पर्याय आहेत त्याची माहिती दिली गेली.धर्म,जाती,भाषा,एकमेकांचा द्वेष या पेक्षा आपले प्रश्न वेगळे आहेत.चांगली नोकरी,मुलांचे शिक्षण,योग्य वेतन,राहायला घर आणि सुरक्षितता या आज आपल्या महत्वाच्या गरजा आहेत आणि त्याची सोडवणूक आपणच केली पाहिजे त्यासाठी आपण संघटित झालो पाहिजे.नियमित भेटत राहिलो,सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकींना शेअर करीत राहिलो तर आपण यातून बाहेर पडू आणि आपले आयुष्य आनंदी जगू शकू हा निर्धार आजच्या या गप्पा च्या कार्यक्रमात महिलांनी व्यक्त केला. घटस्फोट दिलेला आहे,नवऱ्याचे निधन झालेले आहे,मुलगी झाली म्हणून नवऱ्याने सोडून दिले आहे,लहान मुले सोबतीला आहेत,सासू सासरे,आई वडील बघत नाही या साऱ्या परिस्थितीशी सामना करीत या एकल महिला स्वतःची वाट शोधत आहेत.निसार अली, वैशाली महाडिक आणि त्यांची मालवणी मधील टीम एकत्रितपणे या महिलांना संघटित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.समाज म्हणून आता आपली जबाबदारी आहे.निसार अली आणि त्याच्या सोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याची...

-----------------------------------------------

1.रझिया शेख (ओळख न देण्यासाठी नाव बदल केले आहे ).... माझ्या नवऱ्याचा काही महिन्यांपूर्वी हृदय विकाराने मृत्यू झाला आहे.मला दोन लहान मुलं आहेत एक मुलगा व छोटी मुलगी.पतीच्या मृत्यू पश्चात सासरच्यांनी मदत करण्यास नकार दिला तसेच माझे शिक्षण 7 वि पर्यंत झाल्याने मला जेमतेम उपगरातील एका खासगी कंपनीत नोकरीं मिळाली मला दहा हजार मिळतात त्यात सहा हजार रूम चं भाड तसेच प्रवास खर्च वजा केला तर जेम तेम 3 हजार उरतात त्यात दोघांच्या शाळेची फी तसेच इतर खर्च भागवताना तारेवरची कसरत करत अर्ध पोटी उपासी राहावे लागत आहे.अशा परिस्थितीत मला माझ्या दोन्ही मुला सोबत आजचा दिवस स्वता साठी जगता आला त्याचा आनंद आहे .

-----------------------------------------------

2. रहमत खान (नाव बदलले आहे ):माझं लग्न झाल्या पासून मला प्रचंड यातना कराव्या लागल्या. मात्र नंतर गर्भवती झाल्या नंतर डिलीव्हरी च्या वेळी मला एकटीला त्रास सहन करावा लागला.माझ्या मुलीच्या जन्मानंतर माझ्या नवऱ्याने आज पर्यंत तरी तिचे तोंड पहिले नाही. मुलीला तिचे वडील कसे दिसतात ते ही माहित नाही आज मुलगी मोठी झाली आहे.अशा परिस्थितीतून आज मला एक दिवस सुख व आनंद अनुभवता आला त्या साठी मी आयोजकांचे आभारी आहे

Updated : 13 Feb 2023 2:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top