Home > News Update > #MumbaiRape : मुंबईत निर्भया हत्याकांड, बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू

#MumbaiRape : मुंबईत निर्भया हत्याकांड, बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू

#MumbaiRape :  मुंबईत निर्भया हत्याकांड, बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू
X

दिल्लीतील निर्भया हत्याकांडाप्रमाणेच मुंबईतही बलात्कारानंतर पीडितेला अत्याचार करण्याच आल्याचा प्रकार समोर आला आहे. साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कारानंतर गुप्तांगात रॉड घुसवण्यात आल्याचा क्रूर प्रकारही समोर आला आहे. जखमी अवस्थेत या महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मोहन चौहान असे त्याचे नाव आहे.


साकीनाकामधील खैरानी रोड परिसरात शुक्रवारी ही घटना मुंबईत समोर आली. या महिलेवर बलात्कारानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा क्रूरपणा आरोपीने केला होता. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मोहन चौहानला अटक केली आहे, पण यामध्ये अजून काही लोक सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Updated : 11 Sep 2021 8:41 AM GMT
Next Story
Share it
Top