Home > News Update > #RamMandir – राम मंदिर जमीन खरेदी घोटाळ्यात भाजपही सामील? 'आप'चा सवाल

#RamMandir – राम मंदिर जमीन खरेदी घोटाळ्यात भाजपही सामील? 'आप'चा सवाल

सुप्रीम कोर्टाने राम जन्मभूमीचा वाद मिटवल्यानंतर राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. पण त्याआधी झालेल्या जमीन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप झाला आहे.

#RamMandir – राम मंदिर जमीन खरेदी घोटाळ्यात भाजपही सामील? आपचा सवाल
X

courtesy social media

देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा आला आहे. पण यावेळी राम मंदिराच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीचे काम सध्या सुरू झाले आहे. पण यामध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रस्टने जमीन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केला आहे, असा आरोप आपचे खासदार संजय सिंग यांनी केला आहे. हा घोटाळा राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख चंपत राय यांनी केला आहे, असा आरोप त्यांनी केलाय. केवळ 10 मिनिटांत 2 कोटींची जमीन ट्रस्टने 18 कोटींमध्ये खरेदी केली, असा गंभीर आरोप सिंग यांनी केला आहे. सिंग यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन कागदपत्र सादर करत हा गंभीर आरोप केला आहे.

दरम्यान समाजवादी पार्टीचे नेते आणि अयोध्येचे माजी आमदार पवन पांडे यांनीही ट्रस्टचे चंपत राय यांच्यावर खरेदी घोटाळ्याचे आरोप केले आहे. तसेच केंद्राने या आरोपांनी सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


जमिनीची दर प्रत्येक सेकंदाला साडे 5 लाखांनी वाढला? – संजय सिंग

संजय सिंह यांनी या व्यवहाराती कागदपत्र सादर करत सांगितले की, भगवान श्रीरामाच्या नावावर भ्रष्टाचार करण्याचे धाडस कुणी करेल याची कल्पनाही करु शकत नाही. पण राम जन्मभूमी ट्रस्टच्या नावावर चंपत राय यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. अयोध्येच्या हद्दीत येणाऱ्या बागा बिजैसी गावातील जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी या दोन व्यक्तींनी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून पाच कोटी 80 लाख रुपयांची ही जमीन 18 मार्च रोजी दोन कोटी रुपयांना खरेदी केली होती, असा दावा संजय सिंह यांनी केला.



संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी झालेल्या या व्यवहारानंतर पाचच मिनिटांनी चंपत राय यांनी हिच जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांच्याकडून साडे अठरा कोटी रुपयांमध्ये खरेदी केली, असा आरोप सिंग यांनी केला आहे. त्यामुळे दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेल्या जमिनीचा भाव दर सेकंदांला जवळपास साडेपाच लाखांनी वाढला, जगात कुठेही जमिनीचा भाव एवढ्या वेगाने वाढत नाही, त्यामुळे हा घोटाळा आहे आणि याची ईडी तसेच सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी सिंग यांनी केली आहे.

राम जन्मभूमी ट्रस्टचे म्हणणे काय?

यावर ट्रस्टचे प्रमुख चंपत राय यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच एक पत्रक काढून हा व्यवहार कायदेशीर असून कोणताही घोटाळा झाला नसल्याचा दावा केला आहे.


दरम्यान भाजपने याच पत्रकाचा आधार घेत राम मंदिराच्या निर्मितीमध्ये अडथळे आणण्यासाठी हे आरोप केले जात असल्याची टीका केली आहे.

यावर आपचे खासदार संजय सिंग यांनी राम जन्मभूमी ट्रस्टवर झालेल्या आरोपांचे खंडन भाजप का करत आहे, असा खोचक सावल विचारत या घोटाळ्यात भाजपचाही सहभाग तर नाही ना, असा टोला लगावला आहे.




< br > दरम्यान या सर्व प्रकरणावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी बोलले पाहिजे अशी मागणी शिवसेनेची खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Updated : 6 Sep 2022 10:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top