राजगृह तोडफोड: रामदास आठवले राजगृहावर

2120

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या ऐतिहासिक निवासस्थानातील झाडांच्या कुंड्यांची आणि खिडक्यांच्या काचेची मंगळवारी दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली.

या संदर्भात आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकर कुटुंबियाची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आठवले यांनी घडलेली घटना ही अत्यंत चुकीची आहे. या घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो. असं म्हणत या घटनेची CID चौकशी व्हावी. अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

या संदर्भात रामदास आठवले यांनी भाजपच्या नेत्यांवर होत असलेल्या आरोपाबाबत बोलताना भाजपच्या नेत्यांवर या प्रकरणाचे आरोप लावून काही होणार नाही. माझी सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन आहे की, सर्वांनी शांतता बाळगावी. भाजपच्या नेत्यांनी आणि नरेंद्र मोदींनी बाबासाहेबांच्या संविधाना पुढे माथा टेकला आहे.

आंबेडकरी जनता पॉलिटिकली म्हणून जरी आम्ही वेगळे असलो तरी या घटनेच्या निषेधार्थ राजगृहा सोबत आहोत… आम्ही राजगृहाचा अपमान सहन करणार नाही. पक्ष म्हणून वेगळे जरी असलो तरी आमची विचारसरणी एक आहे आणि या घडलेल्या घटनेचा निषेध करत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here