Home > News Update > विखे पाटील पिता-पुत्रांवर कारवाईची शक्यता कमीच?

विखे पाटील पिता-पुत्रांवर कारवाईची शक्यता कमीच?

विखे पाटील पिता-पुत्रांवर कारवाईची शक्यता कमीच?
X

महाराष्ट्राची सत्ता हातातून गेल्यानंतर प्रदेश भाजपमधले मतभेद आता बाहेर येऊ लागलेत. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांनीही आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती.

'हे' ही वाचा...

भाजपच्या अहमदनगर जिल्हा कोअर कमिटीची बैठक आज मुंबईत भाजपच्या (BJP) प्रदेश कार्यालयात झाली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पक्षाचे संघटन मंत्री विजय पुराणिक हे उपस्थित होते. या बैठकीत माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) आणि राधाकृष्ण विखे पाटील (RadhaKrushna Vikhe Patil) यांना समोरासमोर बसून सर्वच मुद्यांवर चर्चा केली.

कर्जत-जामखेडमधील निवडणुकीत विखे पाटील पिता-पुत्रांनी मदत न केल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला होता. या सर्व मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती राम शिंदे यांनी या बैठकीनंतर दिली. या बैठकीत आमच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या, असं सांगत राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्याबद्दल थेट बोलणं टाळलं, तर प्रत्येक पक्षात थोड्याफार प्रमाणात नाराजी असतेच अशी प्रतिक्रिया देत राधाकृष्ण विखे पाटील यांनीही बोलणं टाळलं.

अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाच्या जागा वाढतील असा अंदाज होता, पण प्रत्यक्षात पक्षाला १२ पैकी फक्त ३ जागांवरच विजय मिळवता आला, आणि या पराभवाला विखे पाटील पिता-पुत्र जबाबदार असल्याचा आरोप राम शिंदे यांच्यासह भाजपच्या आणखीही काही पराभूत उमेदवारांनी केला होता.

त्यामुळे विखे पाटील पिता पुत्रांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित झालाय, पण आज बैठकीनंतर राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्याबद्दल थेट बोलणं टाळल्यानं त्यांच्यावर कारवाईची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान पाच वर्षे मंत्रीपद असूनही राम शिंदे यांना कर्जत-जामखेडमध्ये पराभव का पत्करावा लागला याचाही त्यांनी स्वत: विचार करण्याची गरज असल्याचं मत भाजपचे काही नेते खासगीत व्यक्त करत आहेत. राम शिंदे यांना कर्जत-जामखेडमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पराभूत केले होते.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/1064900167181986/

Updated : 27 Dec 2019 10:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top