Home > News Update > Ram Mandir Inauguration:रामंदिराच्या सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी जाणार नाहीत; अमित शहांची कशी आहे तयारी?

Ram Mandir Inauguration:रामंदिराच्या सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी जाणार नाहीत; अमित शहांची कशी आहे तयारी?

Ram Mandir Inauguration:रामंदिराच्या सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी जाणार नाहीत; अमित शहांची कशी आहे तयारी?
X


नवी दिल्ली- अयोध्येमध्ये राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मान्यवर यायला सुरु झाले आहेत. यात भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचं कळतंय. मीडिया रिपोर्टनुसार, अयोध्येमध्ये खूप थंडी आहे. त्यामुळे त्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अडवाणी हे ९६ वर्षांचे आहेत. राम मंदिर आंदोलनात ते प्रमुख भूमिकेत होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील अयोध्येत येणार नाहीत. ते आपल्या कुटुंबासोबत बिर्ला मंदिरात राम सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहतील. सलग तीन तास ते कार्यक्रम पाहणार आहेत. त्यांच्यासोबत इतर भाजप नेते देखील असतील. देशभरात भाजपचे नेते राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे लाईव्ह प्रक्षेपण पाहणार आहेत.

Updated : 22 Jan 2024 3:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top