Top
Home > News Update > रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात भ्रष्टाचार – संभाजीराजे भोसले

रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात भ्रष्टाचार – संभाजीराजे भोसले

रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात भ्रष्टाचार – संभाजीराजे भोसले
X

रायगड किल्ला (Raigad Fort) संवर्धनाचं काम सध्या रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु आहे. मात्र, या कामातच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार संभाजीराजे भोसले यांनी केला आहे.

संभाजी राजे (Sambhajiraje Bhosale) यांनी रायगड प्राधिकरणाच्या कामा संदर्भात एक बैठीक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परीषद घेऊन ही माहिती दिली. ही पत्रकार परिषद अलिबाग जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात पार पडली. यावेळी बोलताना

“महाड ते पाचाड दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. निविदा प्रक्रीया पुर्ण होऊन दोन वर्ष झाली तरी ठेकेदाराने काम सुरु केले नाही. आता या ठिकाणी दोन उप कंत्राटदार नेमण्याचा घाट महामार्ग प्राधिकरणाने घातला आहे. यात कामात टक्केवारी काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे,” सांगत अशा प्रकारे भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.

“रायगड किल्ल्यावर प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांना कार्यारंभाचे आदेश दिल्यानंतर पुरातत्व विभागाने काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. किल्ल्याच्या संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाने करायचे, तर इतर काम प्राधिकरणाच्या विशेष विभागाने करायचे असे दिल्ली येथे प्रधानमंत्री कार्यालयातील बैठकीत ठरले होते. त्यानुसार काही कामे प्राधिकरणाने सुरु केली होती. मात्र, पुरातत्व विभागाने ती थांबवली. हे चुकीचे आहे,”

तसंच यावेळी संभाजीराजे यांनी पुरातत्व विभागाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. “रायगड किल्ल्यावर प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांना कार्यारंभाचे आदेश दिल्यानंतर पुरातत्व विभागाने काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. किल्ल्याच्या संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाने करायचे, तर इतर काम प्राधिकरणाच्या विशेष विभागाने करायचे असे दिल्ली येथे प्रधानमंत्री कार्यालयातील बैठकीत ठरले होते. त्यानुसार काही कामे प्राधिकरणाने सुरु केली होती. मात्र पुरातत्व विभागाने ती थांबवली. हे चुकीचे आहे,” असं म्हणत पुरातत्व विभागामुळे कामास विलंब होत असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे.

Updated : 27 Dec 2019 8:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top