Home > News Update > Video: स्वातंत्र्यावर बोलण्याची कंगना रणौतची औकात नाही, राजू शेट्टी कंगनावर भडकले

Video: स्वातंत्र्यावर बोलण्याची कंगना रणौतची औकात नाही, राजू शेट्टी कंगनावर भडकले

ते स्वातंत्र्य नव्हते तर भीक होती' कंगनाच्या वक्तव्यावर वरुन राजू शेटट्टी यांचा संताप पाहा काय म्हणाले?

Video: स्वातंत्र्यावर बोलण्याची कंगना रणौतची औकात नाही, राजू शेट्टी कंगनावर भडकले
X

अभिनेत्री कंगना रणौतला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कंगनाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ती या व्हिडीओमध्ये टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणते.. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते. या वक्तव्यावरुन आता राजू शेट्टी यांनी कंगना रणौतवर निशाणा साधला आहे.

कंगना राणौत या बाईची स्वातंत्र्य सारख्या मोठ्या विषयावर बोलण्याची औकात आहे का? हे आधी तिने तपासून पहावे. असे प्रतिउत्तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी त्यांनी दिले आहे ते बुलडाण्यातील चिखली येथे आले असताना बोलत होते.

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, भगतसिंह पासून ते नेताजी सुभाष चंद्र बोस पर्यंत स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी हुतात्मे पत्करले, त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर महात्मा गांधींनी देखील देश एक केला होता. आणि कंगना राणौत सारख्या एखाद्या नटीने अशा पद्धतीचे वक्तव्य करणे म्हणजे हा स्वातंत्र्याचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे. असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

Updated : 11 Nov 2021 9:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top