Home > News Update > तुमचं राजकारण घाला चुलीत, भोंग्या बिंग्यांचं बाजूला ठेवा : राजू शेट्टींनी राज ठाकरेंना सुनावलं

तुमचं राजकारण घाला चुलीत, भोंग्या बिंग्यांचं बाजूला ठेवा : राजू शेट्टींनी राज ठाकरेंना सुनावलं

तुमचं राजकारण घाला चुलीत, भोंग्या बिंग्यांचं बाजूला ठेवा : राजू शेट्टींनी राज ठाकरेंना सुनावलं
X

जनतेचे प्रश्न बाजूला सारून ते वेगळेच मुद्दा काढून विरोधक सत्ताधारी एकमेकांवर चिखलफेक करत आहे. तेरी भी चूप, मेरी भी चूप असं चाललयं.. 'जाहीर धार्मिक प्रदर्शन नको आणि हे भोंग्या बिंग्यांचं बाजूल ठेवा' अशा शब्दात माजी खा. राजू शेट्टीनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सुनावलं आहे.

आज विरोधी पक्ष हा विरोधकाची भूमिका पार पाडत नाही. आपण जनतेच्या मूलभूत प्रश्नावर चर्चा केली तर दिल्लीत आपले सरकार असल्यामुळे गॅस दरवाढ, डिझेल, पेट्रोल, खत महागाईबाबत लोक विचारतील, याची त्यांना भीती वाटते. म्हणून विरोधक शांत आहेत. त्यांना असं वाटतं महाविकास आघाडीचे नेते यावर बोलतील. दुसरीकडे आपण काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले तर मग महाविकास आघाडीचे अपयश समोर येईल, अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटते.

शेतकऱ्यांमधील असंतोष, शेतकऱ्यांकडे झालेलं दुर्लक्ष, पिक विमा योजनेत झालेल्या मोठा भ्रष्टाचार आणि शिक्षणाचा बट्ट्याबोळ या मुद्द्यांवर विरोध बोलतील, असं महाविकास आघाडीला वाटतंय. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गप्प आहेत. तेरी भी चूप, मेरी भी चूप म्हणत एकमेकांवर चिखलफेक करत जनतेचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न होतोय. पण स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार आहे. या सर्व प्रश्नांवर आवाज उठवेल आणि जनतेचा जो दबलेला हुंकार आहे, त्याला वाचा फोडेल. म्हणूनच आम्ही हुंकार यात्रा काढली आहे, असं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज तुळजापूर येथून हुंकार यात्रेला सुरवात झाली. यावेळी पत्रकार परिषदेत माजी खासदार राजु शेट्टी यांनी केंद्र सरकार आणि राज्यपालांवर टीका केली. भारतीय लोक हे १०० टक्के धार्मिक आहेत. वेगवेगळ्या धर्माचे आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी आहेत. सर्वजण आपल्या धर्माचं पालन करतात. यासाठी जाहीर धार्मिक प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही. हे भोंग्या बिंग्याचं बाजूला ठेवा. इथं दिवसा वीज नसते. त्याकडे बघा. मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जात नाही, ते बघा. जनता हैराण आहे.

आधी महागाईचं बोला. एका बाजूला एसटीचा संप आणि दुसरीकडे पेट्रोल, डिझेल महाग झाल्याने खासगी वाहनं वापरता येत नाही, त्यावर बोला. प्रत्येकाच्या घरात देवघर आहे. तिथे तास तास देवपूजा आणि तुमची देवाची भक्ती करा, असं म्हणत राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला.

राज्यात निश्चितच टोलवा टोलवी सुरू आहे. कोळशाची कुठलीही टंचाई नाही. खासगी उद्योजकांना कोळसा भेटतो. मग राज्य सरकारला कोळसा कसा भेटत नाही? असा सवाल करत राजू शेट्टींनी राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारला केला. गेल्या महिन्यात ऊर्जामंत्री म्हणतात तीन दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे. आणि कोळसा टंचाईच्या नावाखाली खुल्या बाजारातून २० ते २१ रुपये युनिट दराने वीज खरेदी केली जात आहे. कुणाचे तरी खिशे भरण्यासाठी आणि कुणाचा तरी फायदा होण्यासाठी कोळसा टंचाईचा नटक केलं जात आहे की काय? अशी शंका यामुळे निर्माण होत असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.

Updated : 19 April 2022 11:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top