Home > News Update > राजनाथ सिंह यांनी केली इंदिरा गांधी यांची स्तुती...

राजनाथ सिंह यांनी केली इंदिरा गांधी यांची स्तुती...

राजनाथ सिंह यांनी केली इंदिरा गांधी यांची स्तुती...
X

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची स्तुती केली आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या सेमिनारमध्ये बोलताना राजनाथ सिंह यांनी भारतीय महिलांची स्तुती केली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी परिवारावर नेहमी टीका करताना दिसतात. मात्र, राजनाथ सिंह यांनी अशा प्रकारे इंदिरा गांधी यांची स्तुती केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ते म्हणाले... इंदिरा गांधी यांनी वर्षानुवर्षे केवळ देशाचे नेतृत्व केले नाही तर युद्धाच्या काळातही नेतृत्व दिले. सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या भूमिकेवर बोलताना संरक्षणमंत्र्यांनी राणी लक्ष्मीबाई आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचाही उल्लेख केला आणि राष्ट्रीय विकासात महिला शक्तीच्या भूमिकेविषयी भारताचा अनुभव सकारात्मक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

राजनाथ सिंह म्हणाले, सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या भूमिकेबद्दल बोलणे ठीक आहे, परंतु सुरक्षा आणि राष्ट्रनिर्मितीच्या सर्व क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान मान्य केले पाहिजे. महिलांनी देशाच्या संरक्षणासाठी आणि लोकांच्या हक्कांसाठी शस्त्र उचलल्याची अनेक उदाहरणे आहेत. राणी लक्ष्मीबाई त्यापैकी एक आहेत. संरक्षण मंत्री म्हणाले... "भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वर्षानुवर्षे केवळ देशाची कमानच सांभाळली नाही, तर युद्धाच्या काळातही नेतृत्व केले. काही वर्षांपूर्वी प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपती आणि भारतीय सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर होत्या.

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने पाकिस्तानविरुद्ध 1971 चे युद्ध जिंकले आणि एक नवीन देश बांगलादेशाची निर्मिती केली होती. सिंह म्हणाले की महिला शतकानुशतके पालक आणि संरक्षक म्हणून भूमिका बजावत आहेत. ते म्हणाले, 'सरस्वती ज्ञान, बुद्धी आणि शिक्षणाची देवी आहे, तर मा दुर्गा संरक्षण, शक्ती, विनाश आणि युद्धाची देवी आहे.' भारत सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या सहभागासाठी लवकर पुढाकार घेणाऱ्या काही देशांपैकी एक आहे. महिलांना सैन्यात भरती केले जात आहे.

राजनाथ सिंह म्हणाले,'भारतीय सैन्य नर्सिंग सेवेमध्ये 100 पेक्षा जास्त वर्षांपासून महिला अभिमानाने सेवा देत आहेत. भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांची भरती 1992 मध्ये सुरू झाली. आता लष्कराच्या बहुतेक शाखांमध्ये महिला अधिकाऱ्यांची भरती केली जात आहे. ते म्हणाले की, पुढील वर्षापासून महिला राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रशिक्षण घेऊ शकतील.

Updated : 15 Oct 2021 4:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top