Home > News Update > प्रज्ञा राजीव सातव ॲक्टीव्ह, दिल्लीत नेत्यांच्या गाठीभेटीला सुरुवात

प्रज्ञा राजीव सातव ॲक्टीव्ह, दिल्लीत नेत्यांच्या गाठीभेटीला सुरुवात

प्रज्ञा राजीव सातव ॲक्टीव्ह, दिल्लीत नेत्यांच्या गाठीभेटीला सुरुवात
X

दिवंगत कॉंग्रेस नेते राजीव सातव यांचं 16 मेला निधन झालं. त्यानंतर राज्यभरात सर्व पक्षातील नेत्यांनी राजीव सातव यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली. राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी यांनी राजीव सातव यांच्या शोकसभेत सातव कुटुंबाशी संवाद साधला.

त्यानंतर आता राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव आपला मुलगा पुष्कराजला घेऊन दिल्लीला गेल्या आहेत. या दिल्ली भेटीत त्या कॉंग्रेसह इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत.

त्यांनी दिल्ली येथे गेल्यानंतर राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह प्रियंका गांधी यांची भेट घेतली. तसंच त्यांनी रामदास आठवले यांची देखील भेट घेतली. प्रज्ञा सातव यांच्या या दिल्ली दौऱ्याने दिवंगत राजीव सातव यांच्या कार्यकर्त्यांना आधार मिळाला आहे.



Updated : 23 Nov 2021 9:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top