राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून लाच- रविशंकर प्रसाद

भारत आणि चीन दरम्यान निर्माण झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरणागतीचा गंभीर आरोप केल्यानंतर आता केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलेला आहे. भारत आणि चीन दरम्यान फ्री ट्रेड धोरणाला पाठिंबा देण्यासाठी चीनच्या दूतावासाकडून राजीव गांधी फाउंडेशनला लाच देण्यात आली, असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केलेला आहे.

हे ही वाचा..

राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून लाच- रविशंकर प्रसाद

लोकल कधी सुरू होणार? रेल्वे बोर्डाने घेतला निर्णय

छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय?

2008 मध्ये काँग्रेसने कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीनशी एक करार केला होता. राहुल गांधी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. यावेळी सोनिया गांधी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे उपस्थित होते. पण दोन पक्षांमध्ये अशा पद्धतीने करार करण्याची गरज का निर्माण झाली याचे स्पष्टीकरण अजूनही काँग्रेसने दिले नाही आणि तेही चीनसारख्या देशातील पक्षासोबत असा करार का करण्यात आला, असा सवाल देखील रविशंकर प्रसाद यांनी विचारलेला आहे.

जगातील इतर लोकशाही देशांमधील कोणत्या पक्षांशी काँग्रेसने असेच करार केलेले आहेत याची देखील माहिती द्यावी अशी मागणी प्रसाद यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here