Top
Home > News Update > राजस्थान पुन्हा राजकीय वातावरण तापलं, प्रियंका गांधींचा सचिन पायलटला फोन

राजस्थान पुन्हा राजकीय वातावरण तापलं, प्रियंका गांधींचा सचिन पायलटला फोन

राजस्थान पुन्हा राजकीय वातावरण तापलं, प्रियंका गांधींचा सचिन पायलटला फोन
X

देशात आज राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे योगींनी मोदींची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे मुकुल रॉय यांची पुन्हा एकदा तृणमूल कॉंग्रेसमध्ये घरवापसी होत आहे. तर इकडे महाराष्ट्रात प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. हे सगळं घडत असताना तिकडे राजस्थानमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले सचिन पायलट (Sachin Pilot) पुन्हा एकदा बंडाचं हत्यार उपसण्याच्या मूडमध्ये आहेत.

या सगळ्या घडामोडी घडत असताना सचिन पायलट यांच्याशी थेट प्रियंका गांधी यांच्याशी बातचीत झाली असून पायलटला दिल्लीत बोलावले आहे. ते आज कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्यांची भेट घेतील.

लवकरच राजस्थानच्या कॅबिनेटमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बदलांमध्ये आपल्या नेत्यांची वर्णी लावावी म्हणून सचिन पायलट दबाव तयार करत असल्याचं बोललं जात आहे.

Updated : 2021-06-11T16:18:05+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top