पक्षातील खदखद सोशल मीडियावर मांडाल तर खबरदार – राज ठाकरे

Courtesy: social media

संघटनात्मक बाबतीत कोणतीही बाब आपल्या नेत्यांकडे मांडा, माझ्याकडं मांडा मात्र, सोशल मीडियावर मांडू नका. यापुढे अशा पद्धतीने कुणी अशा पद्धतीने तक्रार केली, तर त्याला पदावरुन काढण्यात येईल असा सज्जड दम राज ठाकरे यांनी भरला आहे.

आज मुंबईत मनसेचं पहिलं अधिवेशन होत आहे. यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातून मनसे कार्यकर्ते अधिवेशनात दाखल झाले आहेत.

तसंच राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि मनसेचे अन्य पदाधिकारीही गोरेगावमधल्या नेस्को संकुलात सुरु असलेल्या कार्यक्रमाला हजर आहेत. या कार्यक्रमात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे य़ांची मनसे नेते पदी निवड करण्यात आली आहे.