Home > Max Political > टीका करुन मोरल डाऊन करु नका: राज ठाकरे

टीका करुन मोरल डाऊन करु नका: राज ठाकरे

टीका करुन मोरल डाऊन करु नका: राज ठाकरे
X

आज मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यभरातील नेते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा मिटींगमध्ये सहभागी झाले होते. तर मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सरकारच्या वतीनं मिटींगला हजर होते. तर विरोधी पक्षातून भाजप च्या वतीनं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, मनसे प्रमुख राज ठाकरे, शेकापच्या वतीनं आमदार जयंत पाटीलही मंत्रालयातून या बैठकीत सहभागी झाले होते.

ही बैठक संपल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी पत्रकारांनी राज यांना सरकार कुठं चुकतंय का? प्रशासनाच्या कामगिरी बाबत प्रश्न केले असता. त्यांनी कोरोनामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, त्याचं उत्तर ना तुमच्याकडे, ना माझ्याकडे, राज्य किंवा केंद्र सरकारडे, कोणाकडेच नाही, जग चाचपडतंय, आता टीका करुन मोरल डाऊन करु नये. असं म्हणत ही वेळ सरकारवर टीका करण्याची नसल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

तसंच यावेळी त्यांनी लॉकडाऊन आपल्याला कधी ना कधी काढावा लागणार असल्याचं सांगत सरकारचा एक्झिट प्लान काय आहे? असा सवाल करत, महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्रासमोर लवकरात लवकर एक्झिट प्लान ठेवावा. अशी मागणी केली.

काय म्हटलंय राज ठाकरे यांनी?

मुंबईची अशी परिस्थिती यापूर्वी पाहिली नव्हती, जुन्या सिनेमात पाहिलं होतं.

कन्टेंन्मेंट झोनमध्ये पोलीस फोर्स वाढवा.

परप्रांतीय जेव्हा महाराष्ट्रात परत येतील. तेव्हा त्यांची तपासणी करा.

सरकारचा लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय?

कोरोनामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, त्याचं उत्तर ना तुमच्याकडे, ना माझ्याकडे, राज्य किंवा केंद्र सरकारडे, कोणाकडेच नाही, जग चाचपडतंय, आता टीका करुन मोरल डाऊन करु नये.

मी जुन्या भाषणांत सांगितलं होतं, अडचण आली की हे परप्रांतीय सर्वात आधी जातील, आता तेच घडतंय.

पोलिसांच्या जागी SRPF लावणं याचा अर्थ पोलीस कमी पडले असं नाही, दीड महिना काम करुन त्यांच्यावर ताण आहे, तो कमी होईल.

परप्रांतीयांची एण्ट्री आणि एक्झिटवर बंधनं हवीत, प्रत्येक ठिकाणी माणुसकी चालत नाही.

सरकारी कर्मचारी, पोलीस ते सफाई कामगार, सर्वांच्या सुरक्षेबाबत सूचना, लॉकडाऊनचा एक्झिट प्लान काय? विषयी प्रश्न विचारला.

गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी.

छोटे दवाखाने सुरु करावेत.

परप्रांतीय मजूर जे बाहेर गेले आहेत, त्यांची तपासणी करुन, नोंदणी करुन महाराष्ट्रात घ्यावं.

MPSC विद्यार्थ्यांना घरी पोहोचवावं.

Updated : 7 May 2020 11:56 AM GMT
Next Story
Share it
Top