Home > News Update > "अनधिकृत फेरीवाल्यांची अशाप्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं" - राज ठाकरे

"अनधिकृत फेरीवाल्यांची अशाप्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं" - राज ठाकरे

अनधिकृत फेरीवाल्यांची अशाप्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं - राज ठाकरे
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी ठाणे महानगर पालिकेमधील मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दोन दिवसांपुर्वी कासारवडवली येथे फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे या जखमी झाल्या होत्या. या हल्ल्यात त्यांची दोन बोटं छाटली गेली आहेत.

कल्पिता पिंपळे यांची विचारपुस केल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "लवकर बऱ्या व्हा हे सांगायला आलो होतो, बाकीचं आम्ही बघतो. अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं. जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय. अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंचा परप्रांतीय फेरीवाल्यांना दिला इशारा

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल चढवला होता. "ठाण्यात परप्रांतिय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून तो ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? निषेधाने हे सुधारणारे नाहीत." असं म्हणत राज ठाकरे कडाडले होते.

Updated : 1 Sep 2021 8:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top