Home > News Update > कसं आहे राज ठाकरेंचं राजकारण ?

कसं आहे राज ठाकरेंचं राजकारण ?

राज ठाकरेंच्या राजकीय प्रवासाबाबत तज्ज्ञांना काय वाटतं?

कसं आहे राज ठाकरेंचं राजकारण ?
X

राज ठाकरे! महाराष्ट्रातील राजकारणातील एक प्रभावी व्यक्तीमत्व... महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असलेल्या राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीबाबत मॅक्समहाराष्ट्र ने 'टू द पॉइंट' या कार्यक्रमात चर्चा केली.

या चर्चेत सहभागी झालेल्या नेत्यांनी व्यक्त केलेली मत...

राज ठाकरे बंडखोर नेते: भारतकुमार राऊत..

स्वत:च्या चुलत भावाबरोबर वैर पत्करून आपल्या काकांशी फारकत घेऊन त्यांनी बंडखोरी स्वभाव दाखवून दिला आहे. असं मत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी राज ठाकरे यांच्या राजकीय प्रवासाचं व्यक्त केलं आहे. राज ठाकरे हे हायवेने जात नाहीत. ते बोरीभाभळीच्या रस्त्यावरून चालत आहेत. भले त्यांना काटे टोचले तरी ते पर्वा करत नाहीत. असंही राऊत यांनी सांगितलं.

वेळेवर भूमिका घ्यायला हवी: संदीप प्रधान, ज्येष्ठ पत्रकार

जेष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी राज ठाकरेंच्या राजकारणाचं विश्लेशण करताना सांगितलं की, सुरवातीला एक वातावरण निर्माण झालं होतं की, राज ठाकरेंचा पक्ष हीच खरी शिवसेना आहे. पण नंतर मात्र, ते दिसलं नाही. उध्दव ठाकरे यांच्याकडे वक्तृत्व नसलं तरी त्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आहे. राज ठाकरे हे वेळेवर भूमिका घेत नाहीत. कार्यकर्त्यांना कार्यक्रम देताना मागे पडतात. संघटना बांधणीसाठी त्यांनी परिश्रम घेतले तर त्यांना माननारा वर्ग मतांच्या पेटीनेही मदत करेन. असं मत प्रधान यांनी व्यक्त केलं.

राजकारणात राज ठाकरेंचा दबदबा आहे: राज ठाकरे

मनसेचे जेष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचं समर्थन केलं. यश अपयश हा भाग वेगळं पण राजकारणात एक दबदबा निर्माण करण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं असल्याचं ते म्हणाले. राज ठाकरे यांचं राजकारण कसं आहे? या विषयावर तीनही मान्यवरांनी आपली मतं थेट पणे मांडली.

पाहा नक्की कोणी काय म्हटलंय?

Updated : 15 Jun 2021 10:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top