Home > News Update > 'ए गप रे.....' असं म्हणत राज ठाकरे पत्रकारावर भडकले

'ए गप रे.....' असं म्हणत राज ठाकरे पत्रकारावर भडकले

ए गप रे..... असं म्हणत राज ठाकरे पत्रकारावर भडकले
X

राज ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासंदर्भात मुंबईत बैठक आयोजित केली होती. यावेळी राज ठाकरे यांना एका पत्रकाराने ममता बॅनर्जी यांच्याविषयी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राज ठाकरे पत्रकारावर भडकल्याचे पहायला मिळाले.

राज ठाकरे यांनी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणूकांसंदर्भात आढावा घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर बोलताना राज ठाकरे यांना एका पत्रकाराने ममता बॅनर्जी यांच्याविषयी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर राज ठाकरे त्या पत्रकारावर ‘ए गप रे....’ असं म्हणत भडकल्याचे पहायला मिळाले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीनंतर राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले होते. मात्र त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ठाकरे गट सहभागी असलेल्या विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तसेच ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांचे नाव घेताच पत्रकाराला ए गप रे म्हणत उत्तर देणं टाळलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एवढंच नाही तर दोन वर्षांआधी ज्या ममता बॅनर्जी यांचे कौतूक केले होते त्याच ममता बॅनर्जी यांचे नाव काढताच राज ठाकरे भडकल्याने राज ठाकरे यांना ममता बॅनर्जी नावाची एलर्जी का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

Updated : 14 Aug 2023 10:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top