Home > News Update > UP election : 'बब्बर' नेता काँग्रेसचा हात सोडणार?

UP election : 'बब्बर' नेता काँग्रेसचा हात सोडणार?

उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारात रंगत आली आहे. तर एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच कांग्रेसचा गब्बर नेता समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

UP election : बब्बर नेता काँग्रेसचा हात सोडणार?
X

सर्वच राजकीय पक्षांनी उत्तर प्रदेश निवडणूकीसाठी कंबर कसली आहे. त्यात सर्वच पक्षांना फुटीचे ग्रहण लागले आहे. त्यातच उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी काँग्रेसने प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र काँग्रेसचे दिग्गज नेते राज बब्बर काँग्रेसचा हात सोडून समाजवादी पक्षात जाण्याची चर्चा सुरू आहे.

उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसमधील दिग्गज नेते काँग्रेसला धक्के देत आहेत. तर युपीए सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेले आर पी एन सिंह आणि माजी खासदार राकेश सचान यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यापार्श्वभुमीवर समाजवादी पक्षाचे नेते फखरूल हसन चांद यांनी कू अॅपवरून पोस्ट करत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी समाजवादी नेते आणि अभिनेते लवकरच समाजवादी होतील असे संकेत दिले आहेत. त्यावरून नव्या चर्चेला उधाण आले आहे.

राज बब्बर यांनी उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भुषवले होते. मात्र राज बब्बर 2019 निवडणूकीनंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षापासून दूर गेले आहेत. तर प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात सक्रीय झाल्यापासून राज बब्बर काँग्रेसमध्ये सक्रीय दिसत नाहीत. तर राज बब्बर यांचा जी-23 नेत्यांमध्ये सामावेश होतो.

राज बब्बर यांनी जनता दल पक्षातून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 1994 साली राज बब्बर यांना समाजवादी पक्षाने राज्यसभेवर पाठवले. तर पुढे 2004 मध्ये राज बब्बर समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडून येत लोकसभेत पोहचले. त्याच काळात समाजवादी पक्षात अमर सिंह यांचा प्रभाव वाढत होता. त्यामुळे आपली घुसमट होत असल्याच्या कारणामुळे राज बब्बर यांनी समाजवादी पक्षाला रामराम केला आणि माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्यासोबत जन मोर्चाची स्थापना केली.

राज बब्बर यांनी 2006 साली सपाला रामराम केल्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा पोटनिवडणूकीत पराभव करत समाजवादी पक्षाला धक्का दिला. त्यानंतर राज बब्बर यांना व्ही के सिंह यांच्याविरोधात निवडणूकीला उभे करण्यात आले. मात्र त्यामध्ये राज बब्बर यांचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसने राज बब्बर यांची उत्तराखंडमधून नियुक्ती केली. त्यानंतर पुढे राज बब्बर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भुषवले. पण 2019 साली लोकसभा निवडणूकीनंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर प्रियंका गांधी यांनी उत्तरप्रदेशात लक्ष घातल्यानंतर राज बब्बर सक्रीय राजकारणापासून दुर गेले. त्यामुळे आता समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांनी केलेल्या ट्वीट केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Updated : 27 Jan 2022 3:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top