जालना जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, शेत जमिनी पुराच्या पाण्याखाली
X
जालना जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नदी-नाले, धरण तुडुंब भरून वाहत आहे, अंबड तालुक्यातील डावरगाव,सुखापुरी लघु प्रकल्प व बारसवाडा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने गल्हाटी नदी धोक्याची पातळी ओलांडू वाहत आहे.
नदी शेजारच्या पिठोरी सिरसगाव,करंजाळा, जालूरा,घुंगर्डे हादगाव आदी गावात नदीचे पाणी शिरले आहे. यामुळे ग्रामस्थांचा जागता पहारा आहे, शेतकऱ्यांच्या शेतीला सध्या तलावाचे रुप आलं असून, शेतकऱ्यांची सोयाबीन, ऊस मोसंबी पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे झाले आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे तातडीने सेटेलाइटच्या माध्यमातून पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. अनेक ठिकाणी शेत जमीन अक्षरशः खरडून गेली असल्याने शेतकऱ्यांवर याचा गुरगामी परिणाम होणार आहे. आधीच कोरोना संकट त्यात आता अतिवृष्टीचे संकट त्यामुळे शेतकरी पूरता हवालदिल झाला आहे.






