Home > News Update > राईनपाडा खटल्याचा निकाल घोषित ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

राईनपाडा खटल्याचा निकाल घोषित ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

राईनपाडा खटल्याचा निकाल घोषित ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
X

संपूर्ण राज्य हादरवून सोडणाऱ्या राईनपाडा हत्याकांडाचा अखेर आज निकाल लागला. पाच भिक्षुकांची हत्याप्रकरणी धुळे न्यायालयाने ७ जणांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती एस.ए. एम. ख्वाजा यांनी आरोपींना शिक्षा सुनावली आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. अखेर राईनपाडा खटल्याप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे जमावाने पोरं धरणारी टोळी समजून भारत शंकर भोसले, भरत मावळे, दादाराव भोसले, आगनुक इंगोले, राजू भोसले या गोसावी डावरे समाजातील भिक्षुकांची हत्या केली होती. हे हत्याकांड १ जुलै २०१८ रोजी राईनपाडा ग्रामपंचायत कार्यालयात घडले होते. दरम्यान, या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते क्रुरतेची परिसीमा गाठणाऱ्या या घटनेचा जलद निकाल लावण्याचे आश्वासन तेव्हा सत्ताधान्यांनी दिले होते. मात्र, निकालासाठी तब्बल ६ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. अखेर त्या सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुन्यावण्यात आली.

जन्मठेप सुनावलेल्या आरोपीमध्ये महारू ओंकार पवार, दशरथ दसन्या पिंपळसे, हिरालाल ढवळ्या गवळी, गुलाब रामा पाडवी, युवराज मणू बौरे, मोतीलाल काशिनाथ साबळे यांचा समावेश आहे. धुळे जिल्हा दंडाधिकारी क्र. १ चे न्यायमूर्ती एस.ए. एम. ख्वाजा यांच्या समोर खटल्याचे कामकाज चालले. यात विशेष सरकारी वकिल उज्वल निकम, जिल्हा सरकारी वकिल देवेंद्रसिंह तंवर, अ. सरकारी वकील निलेश कलाल यांनी विशेष भूमिका निभावली तर तपासाधिकारी तत्कालीन डीवायएसपी श्रीकांत घुमरे यांची साक्ष महत्वाची ठरली आहे.

Updated : 5 Feb 2024 12:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top