Home > News Update > रायगड जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 79 मि.मी. पावसाची नोंद

रायगड जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 79 मि.मी. पावसाची नोंद

रायगड जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 79 मि.मी. पावसाची नोंद
X

रायगड जिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 79.38 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 223.56 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-

अलिबाग-80.00 मि.मी., पेण- 80.00 मि.मी., मुरुड-69.00 मि.मी., पनवेल-160.40 मि.मी., उरण-111.00 मि.मी., कर्जत- 79.50 मि.मी., खालापूर- 69.00 मि.मी., माणगाव- 39.00 मि.मी., रोहा-97.00 मि.मी., सुधागड-84.00 मि.मी., तळा-67.00 मि.मी., महाड-36.00 मि.मी., पोलादपूर-35.00 मि.मी, म्हसळा- 54.00 मि.मी., श्रीवर्धन- 87.00 मि.मी., माथेरान- 122.20 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 270.10 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 58.99 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 7.11 टक्के इतकी आहे.

Updated : 10 Jun 2021 7:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top