Home > Environment > Rain Update: राज्यात मुसळधार; हवामान विभागाची माहिती

Rain Update: राज्यात मुसळधार; हवामान विभागाची माहिती

Rain Update: राज्यात मुसळधार; हवामान विभागाची माहिती
X

गेल्या आठवडाभर मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. गुरुवारपर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा रेड अलर्टही देण्यात आला होता. मात्र आज अनेक ठिकाणीऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मागील दोन दिवसांच्या तुलनेच आज पावसाचा जोर काहीसा ओसरणार असल्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे तर आज मुंबईला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सातारा या जिल्ह्यांना आजही अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये आज पाऊस असणार आहे याच पार्श्वभूमीवर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुण्यात मात्र पुढील 3-4 दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावेल

Updated : 28 July 2023 4:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top