Home > News Update > Rain Alert राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस: हवामान खात्याचा अंदाज

Rain Alert राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस: हवामान खात्याचा अंदाज

Rain Alert राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस: हवामान खात्याचा अंदाज
X

Rain Alert : राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज IMD हवामान विभागाने दिला आहे. आज आणि उद्या विदर्भातील काही जिल्ह्यात ढगांच्या गडगटांसह पाऊस होणार असल्याचा अंदाज दिला आहे.

राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ झाली आहे. गारवा गायब होऊन दुपारी ऊन तापत आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात ढगाळ वातावरण तर विदर्भातील नागपूर, अमरावती, गोंदिया, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.

उत्तर व मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत १० व ११ फेब्रुवारीला तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Updated : 10 Feb 2024 6:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top