Home > News Update > रायगडची जलकन्या ११ वर्षीय रुद्राक्षी टेमकरचा नवा विक्रम : २६ किमी अंतर केले पोहून पार

रायगडची जलकन्या ११ वर्षीय रुद्राक्षी टेमकरचा नवा विक्रम : २६ किमी अंतर केले पोहून पार

रायगडची जलकन्या ११ वर्षीय रुद्राक्षी टेमकरचा नवा विक्रम : २६ किमी अंतर केले पोहून पार
X

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील रायगडची जलकन्या रुद्राक्षी मनोहर टेमकर या ११ वर्षीय मुलीने आज दिनांक २१मार्च रोजी शिवजयंतीच्या दिवशी नवा विक्रम करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे.

रुद्राक्षी ही लांब पल्ल्याची जलतरणपटू असून, तिने रेवस ते गेटवे ऑफ इंडिया आणि एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया पोहून पार केले होते. त्यानंतर तिच्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

तर आज सोमवारी मध्यरात्री दीड वाजता समुद्राच्या लाटांवर झेप अंधारात घेत धरमतर ते मांडावा हे सागरी २६ किमी अंतर पोहून पार करत एक नवा विक्रम स्थापित केला आहे. धरमतर ते मांडावा जेट्टी पोहून पार करणारी रुद्राक्षी पहिली मुलगी ठरली आहे.

रुद्राक्षीने हे अंतर ५ तास ५४ मिनिटात पूर्ण केले. तिच्या या विक्रमाची नोंद घेत अलिबाग, मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी रुद्राक्षीचे अभिनंदन केले. यावेळी रुद्राक्षीचा सत्कार व कौतुक करण्यासाठी अनेक मान्यवरांनी गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याच्या प्रेरणेने आज रुद्राक्षीने आपल्या कर्तुत्वाने रायगड जिल्ह्याचे नाव उंचाविले असून तिला तिच्या आईने वडिलांनी सदैव बळ दिले आहे.

Updated : 21 March 2022 9:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top