Home > News Update > राहुरीत डोक्यात दगड घालून वेटरची निर्घृण हत्या

राहुरीत डोक्यात दगड घालून वेटरची निर्घृण हत्या

राहुरीत डोक्यात दगड घालून वेटरची निर्घृण हत्या
X

राहुरी : राहुरी तालुक्यातील हॉटेल साक्षीमध्ये एका परप्रांतीय वेटरचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. सोनू थापा असे हत्या झालेल्या वेटरच नाव असून, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी मध्यरात्री नंतर 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे, मयत वेटरबरोबर असलेला एक नामदेव नामक वेटर पसार झाला असून तो शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील रहिवासी आहे. हे दोघेही हॉटेलमध्येच मुक्कामाला रहायचे. खुनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सोनू थापा सोबत काम करणारा वेटर फरार झाल्याने संशयाची सुई त्याच्याकडे वळाली आहे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Updated : 19 Sep 2021 9:58 AM GMT
Next Story
Share it
Top