Home > News Update > सायंकाळी भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये दाखल होणार...

सायंकाळी भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये दाखल होणार...

सायंकाळी भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये दाखल होणार...
X

मध्य प्रदेशमध्ये राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेचा आज रविवारी 12 वा दिवस आहे. आगर जिल्ह्यात जास्तीत जास्त तीन दिवस आणि दोन रात्री मुक्काम केल्यानंतर ही यात्रा मध्य प्रदेशातून (madhya pradesh) सायंकाळी उशिरा राजस्थानमध्ये (Rajastan) दाखल होईल. आज सकाळी सहा वाजता आगर येथील अन्नपूर्णा ढाब्याजवळून यात्रेला सुरुवात झाली.




या यात्रेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक नेतेही मोठय़ा संख्येने सहभागी होत आहेत. भजन गायक पद्मश्री प्रल्हादसिंग टिपानिया, आमदार जितू पटवारी, अरुण यादव, विक्रांत भुरिया हे सुद्धा आज यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालताना दिसले.




यात्रेची सकाळचा ब्रेक १० वाजता सोयकलन आगर येथे असेल. सायंकाळी ७ वाजता आगर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील पिपलेश्वर बालाजी मंदिर डोंगरगावमार्गे यात्रा राजस्थानमध्ये दाखल होईल. यात्रेचा रात्रीचा मुक्कामही येथेच असेल.



राहुल गांधी यांचा आजचा कार्यक्रम कसा असेल..





Updated : 4 Dec 2022 4:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top