नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहा हूं : राहुल गांधी
X
भारत जोडो यात्रा राजस्थान येथे असताना सायंकाळी राहुल गांधी यांनी भाषण केले. द्वेषाच्या बाजारात माझ प्रेमाचं दुकान आहे, असं राहुल गांधी यांनी वक्तव्य करुन भाजपला टोला लगावला. "डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, या सर्वांनी नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोली थी" असे विधान राहुल गांधी यांनी केले. तसेच राहुल गांधी यांनी भाजपच्या नेत्यांना देखील आव्हान केले आहे की "तुम्ही सर्वजण या आणि नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोल लिजीए. आपला देश प्रेमाचा देश आहे, आपला देश द्वेषाचा नाही." असे राहुल गांधी म्हणाले. "तसेच गरिब लोकांसाठी राजस्थानात चागंल्या योजना देखील आहेत अशी सरकारची स्तुती देखील राहुल गांधी यांनी यावेळी केली. हिंदुस्थानात गरिब शेतकऱ्यांचा मुलगा इंग्रजी शाळेत शिकला नाही पाहीजे, असं या सरकारच उद्दीष्ट आहे." अशी टीका राहुल गांधी यांनी भाजपवर केली. तसेच काँग्रेसचे उद्दीष्टे आहे हिंदुस्थानतला गरिब शेतकऱ्याचा मुलाने अमेरिकेत जाऊन त्याच भाषेत उत्तर दिलं पाहीजे, त्यामुळे राजस्थानात आम्ही १७०० इंग्लिश मीडीयम शाळा सुरु केल्या आहेत.
तसेच मनरेगा स्कीम फक्त ग्रामीण भागत सुरू होती. ती राजस्थानातील शहरात आणल्यानंतर अनेकाना त्याचा फायदा झाला. अशी सरकारची स्तुती करताना राहुल गांधी आपल्याला पाहायाला मिळाले दुसऱ्या राज्यात फक्त ग्रामीण भागातच मनरेगा स्कीम सुरु आहे.प्रत्येक राज्यातील कार्यकर्त्याचा आवाज सरकार पर्यंत पोहचला पाहीजे. ३५०० किलोमीटर आमच्या यात्रेने पायी प्रवास केला. राजस्थानच्या सरकारने फक्त १५ किलोमीटर पायी प्रवास केला तर जनतेचे अनेक प्रश्न त्यांना समजू शकतात. आपल्या भाषणातून राहुल गांधी यांनी महत्वाचे मुददे मांडले.






