Home > News Update > Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधींनी फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप, 22 खासदारांच तक्रारीचं पत्र

Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधींनी फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप, 22 खासदारांच तक्रारीचं पत्र

Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधींनी फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप, 22 खासदारांच तक्रारीचं पत्र
X

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी आज लोकसभेत केला. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारीचं पत्र दिलं आहे. राहुल गांधींनी संसदेत केलेल्या गैरवर्तनासंदर्भात भाजपच्या 22 खासदारांनी तक्रारीचं पत्र दिल्याची माहिती आहे.

संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरला. खासदारकी बहाल झाल्यानंतर आज राहुल गांधी अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेत सहभागी झाले. मात्र आजच्याच दिवशी राहुल गांधी आरोपांच्या भोवऱ्यात अडकले. सभागृहातून जात असताना राहुल यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केला आहे. लोकसभा सचिवालयाची सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेत असभ्य वर्तनाबाबत सर्वांशी बोलून नियमानुसार कारवाई केली जाईल, असं सांगितलं जात आहे.

स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या वर्तनावर तीव्र आक्षेप घेतला म्हटलं की, "माझा एका गोष्टीवर आक्षेप आहे. ज्यांना माझ्या आधी बोलण्याची संधी देण्यात आली होती, त्यांनी जाण्यापूर्वी असभ्य वर्तन केलं. संसदेच्या महिला सदस्य असलेल्या संसदेला फ्लाइंग किस देऊ शकणारा हा केवळ दुष्ट पुरुष आहे. असं अशोभनीय वर्तन यापूर्वी कधीही देशाच्या संसदेत पाहिलं नव्हतं.''

Updated : 9 Aug 2023 12:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top