Home > News Update > भारत जोडो यात्रेत सोलापुरी लेझीम ठेक्याचा झंकार

भारत जोडो यात्रेत सोलापुरी लेझीम ठेक्याचा झंकार

X

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी विविध समाज घटकाशी संवाद साधत असतात. तसेच विविध भागातील परंपरा आणि संस्कृतीशी जुळवून घेत त्याचा आनंद घेताना पहायला मिळतात. त्याप्रमाणेच राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी भारत जोडो यात्रेत सोलापुरी लेझीमचा झंकार घुमला.

भारत जोडो यात्रेत सोलापुरची सांस्कृतिक ओळख असलेला आगळ्या-वेगळ्या लेझिम प्रकाराची झलक पहायला मिळाली. अकोला जिल्ह्यातील धानेगाव येथील भारत जोडो यात्रेत राहुल गांधी, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह लोकांसमोर सोलापुरच्या प्रसिध्द वारद चाळ नवरात्र महोत्सव मंडाळाच्या 300 कलाकारांनी लेझिमची झलक दाखवली. यावेळी अलोकिक, शिस्तबध्द, मर्दानी रांगडा कलाप्रकार सादर करीत वातावरणता उत्साह निर्माण केला.

यावेळी राहुल गांधी यांनाही लेझिमचा मोह आवरला नाही. त्यांनी सुरक्षा रक्षकांचा प्रचंड गराडा आणि गर्दी असतानाही हातात लेझीम घेऊन कलाकारांना सलामी दिली. यावेळी भारत जोडो यात्रेतील नागरिकांनी लेझीम पाहण्याचा आनंद घेतला.

Updated : 20 Nov 2022 1:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top