Home > News Update > Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रेचा' असा असेल 'रुट मॅप'

Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रेचा' असा असेल 'रुट मॅप'

Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा असा असेल रुट मॅप
X

New Delhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या यशस्वी टप्प्यानंतर आता 'भारत जोडो न्याय यात्रेचा' मार्ग काँग्रेसकडून जाहीर करण्यात आला आहे. ही यात्रा ६७ दिवसाची असून एकूण ६ हजार ७०० किमीहून अधिक अंतर कापणार आहे. ही यात्रा 110 जिल्हे, 100 लोकसभा आणि 337 विधानसभेतून जाणार आहे

भारत जोडो न्याय यात्रा ही देशातील १४ राज्यांमधून ती मार्गक्रमण करणार आहे. यासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत घेत रुट मॅपची घोषणा केली. मणिपूर ते मुंबई अशी यात्रा मणिपुर ते मुंबई (14 जानेवारी ते 20 मार्च) अशी ही भारत जोडो न्याय यात्रा चालणार आहे. ही यात्रा यापूर्वीच्या भारत जोडो यात्रेपेक्षा थोडी वेगळी असणार आहे. यामध्ये पायी यात्रेचा मार्ग कमी असणार आहे, तर बसमार्गानं जास्तीत जास्त लोकांना भेटण्याची योजना आखण्यात आली आहे.

असा असेल भारत जोडो न्याय यात्रेचा रोड मॅप

• मणिपूर | 107 किमी | 4 जिल्हे

• नागालँड | 257 किमी | 5 जिल्हे

• आसाम | 833 किमी | 17 जिल्हे

• अरुणाचल प्रदेश | 55 किमी | 1 जिल्हा

• मेघालय | 5 किमी | 1 जिल्हा

• पश्चिम बंगाल | 523 किमी | 7 जिल्हे

• बिहार | 425 किमी | 7 जिल्हे

• झारखंड | 804 किमी | 13 जिल्हे

• ओडिशा | 341 किमी | 4 जिल्हे

• छत्तीसगड | 536 किमी | 7 जिल्हे

• उत्तर प्रदेश | 1,074 किमी | 20 जिल्हे

• मध्य प्रदेश | 698 किमी | 9 जिल्हे

• राजस्थान | 128 किमी | 2 जिल्हे

• गुजरात | 445 किमी | 7 जिल्हे

• महाराष्ट्र | 480 किमी | 6 जिल्हे

या यात्रेची लांबी 6 हजार 700 किमीहून असून 67 दिवसात 110 जिल्हे त्यात 100 लोकसभा आणि 337 विधानसभेतून ही यात्रा जाणार आहे.





Updated : 5 Jan 2024 10:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top