…अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची ‘फोन पे चर्चा’

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारने सर्व राज्याला आर्थिक मदत करण्याची मागणी करताना ज्या राज्यामध्ये कॉंग्रेसचं सरकार आहे. अशा राज्यांमध्ये कॉंग्रेस जनतेला थेट मदत करत आहे. मात्र, जर केंद्र सरकार राज्यांच्या मागे उभं राहिलं तर अधिक मदत करता येऊ शकते.

भाजपशासीत बरोबरच देशातील सर्व राज्यांना केंद्र शासनाने आर्थिक मदत करणं गरजेचं असल्याचं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्रातही कॉंग्रेस सत्तेत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना चे रुग्ण आहेत. तसंच महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात राहुल गांधी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राहुल यांनी… महाराष्ट्रात कॉंग्रेस मुख्य निर्णय प्रक्रियेत नाही. असं विधान केलं होतं.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं होतं. महाराष्ट्रात काँग्रेसने सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेला नाही. महाराष्ट्रातील सरकारचा काँग्रेस एक भाग आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात आहे. हे पाहता काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं वक्तव्य जबाबदारी झटकणारं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर खापर फोडण्याचा हा प्रयत्न असल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं.

त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या सरकार मध्ये ताळमेळ नसल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनच्या फोन वर या संदर्भात चर्चा झाली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी काँग्रेस पूर्णपणे सरकार सोबत आहे असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

दरम्यान राज्यामध्ये अलिकडे महत्वाच्या निर्णयामध्ये कॉंग्रेस नेत्यांना विश्वासात घेतलं जात नाही. अशी तक्रार कॉंग्रेस च्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांचं हे विधान आल्याचं बोललं जात आहे.

काय म्हटल होतं राहुल गांधी यांनी?

यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत. सर्वात पहिल्यांदा आपण जर कोरोनाचा विचार केला तर… ज्या जागा ज्यादा तर कनेक्टेड आहेत. (दाटीवाटीच्या आहेत. लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या आहेत) तिथं जास्त कोरोना चा प्रसार होतो. जर आपण दिल्ली, मुंबई, पुणे अशी शहर पाहिली तर ही कनेक्टेड शहर आहे.

मुंबई हे भारतातील सर्वाधीक कनेक्टेड शहर आहे. या ठिकाणी कोरोना चे रुग्ण अधिक आहेत. मला या ठिकाणी फरक लक्षात आणून द्यायचा आहे. आम्ही महाराष्ट्रात सरकारला पाठींबा दिला आहे. पण आम्ही महाराष्ट्रात मुख्य निर्णय प्रक्रियेत नाही. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान आणि पॉडेचरी या ठिकाणी मुख्य भूमिकेत आहोत. हा फरक आहे. मुख्य निर्णय प्रक्रियेत असलेल्या सरकार मध्ये आणि पाठींबा दिलेल्या सरकार मध्ये.

महाराष्ट्र हे त्याच्या नैसर्गिक कनेक्टिव्हिटी मुळे संघर्ष करत आहे. महाराष्ट्र भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे. हे भारताचे सर्वात मोठं व्यापार केंद्र आहे. त्यामुळे भारत सरकार ने महाराष्ट्राला पुर्णपणे मदत केली पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेला मदत केली पाहिजे.