Home > News Update > पूरग्रस्तांसाठी सरकारवर दबाव आणू , वेळप्रसंगी संघर्ष करू - फडणवीस

पूरग्रस्तांसाठी सरकारवर दबाव आणू , वेळप्रसंगी संघर्ष करू - फडणवीस

पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव आणू, वेळप्रसंगी संघर्ष करू असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते सांगली येथे पूरग्रस्त भागांचा दौरा करत असतांना बोलत होते.

पूरग्रस्तांसाठी सरकारवर दबाव आणू , वेळप्रसंगी संघर्ष करू - फडणवीस
X

सांगली : 2019 च्या तुलनेत यंदा पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुराने बाधित झालेल्या नागरिकांसाठी अधिक नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी सरकारवर दबाव आणून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी संघर्ष करू, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सांगलीच्या भिलवडी येथे पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. भिलवडी येथून फडणवीस यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी त्यांनी पूरबाधितांशी संवाद देखील साधला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2019 च्या प्रमाणेच हा महापूर आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात खूप मोठं नुकसान झालेल आहे. सर्व सामान्य माणसांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचेच या महापुरामुळे अतोनात नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. 2019 मध्ये तत्कालीन सरकारच्या माध्यमातून आम्ही एनडीआरएफच्या निकषांपलीकडे जात सर्व पातळ्यांवर पूरग्रस्तांना, शेतकऱ्यांना मदत केली होती. या वेळीही अधिक नुकसान आहे, त्या पार्श्वभूमीवर अधिक नुकसान भरपाई मिळायला हवी, आणि त्यादृष्टीने मदत मिळण्यासाठी राज्य सरकारवर आम्ही दबाव आणू आणि पूरग्रस्तांना मदत मिळेपर्यंत संघर्ष करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Updated : 29 July 2021 10:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top