Home > News Update > पंजाबचे `कॅप्टन` बदलणार ?

पंजाबचे `कॅप्टन` बदलणार ?

पंजाबचे `कॅप्टन` बदलणार ?
X

पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वीच विद्यमान मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंह यांना राजीनामा देण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहे. आज सध्याकाळी होण्याऱ्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव घोषीत होणार आहे.

मुख्यमंत्र्याचे सहकारी सुनिल जाखर यांची नव्या विधीमंडळ गटनेतेपदी आणि मुख्यमंत्रीपदी निवड होणार असल्याचे कॉंग्रेस अंतर्गत सुत्र सांगत आहे. तशा पध्दतीचे सुचक ट्विट देखील त्यांनी केले आहे.


काल रात्री उशिरा कॉंग्रेस आमदारांची महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर पक्षनेतृत्वानं आज विधीमंडळ पक्षाची महत्वाची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसच्या सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार बैठकीत एका ओळीचा ठराव मांडून विधीमंडळ पक्षनेता निवडीचा अधिकार कॉंग्रेस पक्षश्रेष्ठीला देण्याचा निर्णय घेतला जाईल. जाबमधे सध्या सांकृतिक कार्यक्रम `श्राध`ची तयारी सुरु असून हे पर्व सुरु होण्यापूर्वी नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करुन मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पाडला जाणार आहे.

Updated : 18 Sep 2021 8:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top