Home > Max Political > Punjab : मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या पुतण्याला ED कडून अटक

Punjab : मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या पुतण्याला ED कडून अटक

Punjab : मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या पुतण्याला ED कडून अटक
X

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या पुतण्याला इडीने अटक केली आहे. देशात ५ राज्याच्या विधानसभेच्या निवडणूका होत आहे. यामध्ये पंजाबचा समावेश आहे. पंजाब मध्ये सध्या काँग्रेस ची सत्ता आहे. शेतकरी आंदोलनामुळे पंजाब मध्ये भाजपला मोठा विरोध होत आहे. मात्र, आम आदमी पक्ष काँग्रेस ला चांगलीच टक्कर देत आहे. त्या दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांचा पुतण्या भूपिदर सिंह याला Ed ने जालंधरमधून अटक केली आहे.

अवैध वाळू उत्खनन प्रकरणी ईडीने ही अटक केली आहे. गुरुवारी संध्याकाळी इडीने त्यांना. ताब्यात घेतले होते. आणि काही तास चौकशी केली होती. आज त्यांना सीबीआय कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने भूपिदर सिंह घरावर छापा टाकून तेथून आठ कोटी रुपये जप्त केले होते. छापेमारीत अवैध वाळू उत्खनन, मोबाईल फोन, २१ लाखांहून अधिक किमतीचे सोने आणि १२ लाख रुपयांचे रोलेक्स घड्याळ सापडल्याचे ईडीने सांगितले होते. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. चन्नी यांच्या पुतण्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यांवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत हा मुख्यमंत्र्यांना धमकावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता.

अवैध खाणकाम मोठा मुद्दा

पंजाबमध्ये बेकायदेशीर वाळू उत्खनन ही एक मोठी समस्या आहे. या प्रकरणाबाबत पंजाबमधील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेस सोडल्यानंतर माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसच्या काही आमदारांचा या कामात सहभाग असल्याचा आरोप केला होता. याबाबत आपण काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना माहिती दिली होती, असेही अमरिंदर सिंह यांनी म्हटले होते.

Updated : 4 Feb 2022 6:00 AM GMT
Next Story
Share it
Top