Home > News Update > वाहतूक कोंडीतही पुण्याचा झेंडा

वाहतूक कोंडीतही पुण्याचा झेंडा

वाहतूक कोंडीतही पुण्याचा झेंडा
X

PUNE : पुणे हे आता जगातील सातव्या क्रमांकाचे वाहतूक कोंडीचे शहर झाले आहे. गेल्या काही महिन्यांत पासून पुण्यातील वाहतुकीची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सद्या पुण्यातील वाहतूक कोंडी ही बिकट अत्यंत होत आहे. पुणेकर नागरिक वाहतूक कोंडीला वैतागले असून याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. लोकप्रतिनिधी यांनी तर वाहतुकीच्या समस्येकडे पाठ फिरवल्याचे चित्रं दिसून येत आहे.

शहराच्या विकास कामाच्या नावाखाली पुणे शहरातील अनेल रस्ते खोदून ठेवले आहेत. त्या कामांची वेळ पूर्ण होऊन देखील अद्याप कामं झाली नाहीत. त्यातच शहरात वाहनसंख्या वाढत असून, अरुंद रस्ते आणि अनेक ठिकाणी सुरू असलेले मेट्रोचे काम यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. वारंवार शहरातील नागरिकांनी वाहतुकीच्या कोंडीवर महापालिका प्रशासन, स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी, याच्याकडे तक्रारी करून देखील वाहतूक समस्येवर सर्वांनीच एकमताने दुर्लक्ष केल्याचे चित्रं सामोर येतं आहे. यासंदर्भात पुणेकरांनी अनेक वेळा माध्यामांसमोर आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहे. त्या देखील अद्याप निष्फळ ठरल्या आहेत.

पुण्यात दिवसागणित वाढतं चाललेली वाहतूक कोंडी त्यासंदर्भातली समस्या ही चर्चेचा विषय बनली आहे. यातच आता पुण्याच्या वाहतुक कोंडीचं नाव हे जगाच्या पटलावर आलं आहे. पुण्याचा जगात वाहतूक कोंडीत सातवा क्रमांक लागल्याने पुण्याने वाहतूक कोंडीतही आपला झेंडा रोवला आहे. अशी मिश्किल टीकात्मक चर्चा पुणेकर नागरिकांमध्ये आहे. याचे कारण असे की गेल्या वर्षात सर्वांत जास्त वाहतूक कोंडी असलेल्या जगभरातील शहरात पुण्याचा सातवा क्रमांक लागला आहे.

Updated : 6 Feb 2024 12:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top