गाडी एकाची फाईन दुसऱ्याला!

कुणाचा प्रसार कमी करण्यासाठी सरकारने अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लागू केलेले आहे. लॉकडाऊनच्या काळात लोक विनाकारण बाहेर पडतात. त्यामुळे पोलिसांनी अनेकांच्या गाड्या जप्त केल्याचे प्रकार घडले आहेत. यावरून जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात संताप देखील निर्माण झालेला आहे। याच पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये उघडकीस आलेला आहे. संतोष रासकर यांनी वाहतूक पोलिसांच्या अजब कारभाराचा पुरावा आपल्या फेसबुक पोस्टमध्ये दिलेला आहे. त्यांनी नेमकं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले आहे ते पाहूया…

“राज्य सरकार आणि वाहतूक विभागाचा गल्ला भरू कारभार. माझ्याकडे Mh12 SN2729 क्रमांकाचे वाहन आहे, त्यावर दंड लावल्याचा मेसेज मला आला, हेल्मेट ना घालणे आणि वाहतूक परवाना न बाळगणे असे दोन प्रकार त्यात नमूद होते मुळात माझा परवाना कोणीच तपासण्यासाठी यापूर्वी मागितला नसल्याने मला आश्चर्य वाटले म्हणून मी फोटो काढून पाहिला, तर फोटो माझा किंवा माझ्या गाडीचा नव्हताच, याविषयी फरासखाना येथे चौकशीला गेलो असता त्यांनी मला येरवडा गोल्फ क्लब येथे जाऊन या तक्रारीचे निरसन होईल असे सांगितले, बरे तिथे मला कळले हा दंड ग्रामीण पोलिसांनी लावला आहे म्हणून तुम्ही तिकडे जा. आता माझी ही गाडी गेल्या कित्येक महिन्यात कर्वेनगर ते दगडूशेठ गणपती याशिवाय गेलीच नाही. नसता मनस्ताप झाला. हे दंड कोठेही वसूल करू शकतात पण यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी मला 15 km चा फेर पडावा.

एकंदर काय तर वाहतूक दंड लावून तिजोरी भरण्याचा उद्योग चाललाय.
थोडक्यात हे निषेध करायच्या पण लायकीचे नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here