Home > News Update > Lonawala Bus Accident : खंडाळा घाटात बस दरीत कोसळली

Lonawala Bus Accident : खंडाळा घाटात बस दरीत कोसळली

Pune-Mumbai Highway : जुन्या मुंबई पुणे हायवेवरील बोरघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये 12 प्रवाश्यांचा मृत्यू झाला असून 25 जण गंभीर जखमी झाले आहेत.

Lonawala Bus Accident : खंडाळा घाटात बस दरीत कोसळली
X

Lonawala Bus Accident : जुन्या मुंबई पुणे हायवेवर असलेल्या लोणावळ्याजवळील बोरघाटात खासगी बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला. या अपघातात. 12 प्रवाश्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (old mumbai--pune highway accident)

पुण्यावरून मुंबईला जाणारी खासगी बस जुन्या पुणे-मुंबई हायवेवरून भरधाव वेगाने दरीत कोसळली. यामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 25 जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. (Bus falls into ravine on Mumbai-Pune route; 8 people died)

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस पुणे येथून मुंबईला निघाली होती. ही बस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून (Mumbai Pune Highway) जात असताना लोणावळ्याजळील बोरघाटातील (Borghat bus Accident) शिंगरोबा मंदिराजवळ भरधाव वेगाने दरीत कोसळली. या बसमध्ये 41 लोक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 जण गंभीर जखमी झाले आहे. या जखमींना मदत पोहचवण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पोलिसांकडून मदतकार्य सुरु आहे.

Updated : 15 April 2023 4:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top