Home > News Update > पुण्यात आता नाईट कर्फ्यू : पुणे विभागीय आयुक्तांनी घेतले कठोर निर्णय

पुण्यात आता नाईट कर्फ्यू : पुणे विभागीय आयुक्तांनी घेतले कठोर निर्णय

पुण्यात आता नाईट कर्फ्यू :  पुणे विभागीय आयुक्तांनी घेतले कठोर निर्णय
X

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं लॉकडाऊनच्या अफवाचं पीक आलं असतान पुण्यात आज कोरोनामुळे पुणेकरांना पुन्हा काही निर्बंध घालण्यात आले आहेत. पुण्यात रात्री ११ वाजेनंतर बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली असून, २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद राहणार आहेत.

पुणे शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज पालकमंञी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला खासदार,आमदार ,पोलिस आयुक्त, अधिकारी उपस्थित होते. शहरात आवश्यक ठिकाणी मायक्रो कंटेन्मेन्ट झोन तयार करणे, चाचण्या वाढवणे आणि शहर आणि तालुका स्तरावरील कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

तसेच राज्यातून रेल्वे, एसटी, खाजगी ट्रँव्हल्समधून येणाऱ्या वाहनांवर कोणतीही बंधने लादण्यात आली नाही. लग्न समारंभात फक्त दोनशे लोकांना परवानगी असून इतर सार्वजनिक कार्यक्रमात जर नियमांचे उल्लघन झाल्यास कारवाई करण्याचा इशारा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे. तसेच खाजगी क्लासेस, महाविद्यालये, शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असून पुढील निर्णय परिस्थिती बघून घेतला जाईल. राञी अकरा ते पहाटे सहा पर्यत नियंञित संचार असून आवश्यक वाहने वगळता या दरम्यान इतर नागरिकांनी संचार केला तर कारवाई केली जाणार आहे असं विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले आहे.

"करोना बाधितांची रुग्णसंख्या सुरुवातीच्या काळात ४ टक्के होती. आता १० टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये २८ फेब्रवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे अभ्यासिका वर्ग ५० टक्के क्षमतेने चालविण्यात यावेत. तसेच रात्री ११ पर्यंतच हॉटेल सुरू ठेवता येणार असून, ११ ते ६ पर्यन्त संचार बंदी ठेवण्यात येणार आहे. मात्र या काळात जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या वाहतूक करणार्‍यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती राव यांनी दिली.

पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या करोना रुग्णांची संख्या लक्षात घेता. नागरिकांच्या अधिकाधिक तपासण्या करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यानुसार तालुकानिहाय कोविड सेंटर उभारले होते. ते आता पुन्हा कार्यान्वित केले जातील आणि आपल्या शहराचा विचार करायचा झाल्यास भविष्यात रुग्ण संख्या वाढल्यास जम्बो कोविड सेंटर सुरू केले जाईल, पण नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे," असं आवाहन आयुक्तांनी महापौरांना केलं आहे

Updated : 21 Feb 2021 8:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top