Home > News Update > भटक्या समाजातील कुटुंबियांच्या मदतीसाठी तरुणाई सरसावली, 200 कुटुंबियांना केली अन्नधान्याची मदत

भटक्या समाजातील कुटुंबियांच्या मदतीसाठी तरुणाई सरसावली, 200 कुटुंबियांना केली अन्नधान्याची मदत

भटक्या समाजातील कुटुंबियांच्या मदतीसाठी तरुणाई सरसावली, 200 कुटुंबियांना केली अन्नधान्याची मदत
X

पुण्यातील भोसरी परिसरामध्ये भटक्या समाजातील अनेक कुटुंब वास्तव करतात. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालावरच्या लोकांची उपासमार होत असल्याचे समजताच काही तरुणांनी एकत्र येत लोकसहभागातून 200 कुटुंबियाना 2100 किलो अन्नधान्याचे वाटप केले आहे.

भटक्या समाजातील कुटुंबियांसाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर अनेकांनी गहू, तांदूळ तसेच रोख रकमेची मदत केली. भोसरी परिसरातील भटक्या समाजातील लोकांना तब्बल 2,100 किलो धान्याचे 204 किट बनवून वितरित करण्यात आले. लॉकडाऊनच्या झळा सोसत असलेल्या भटक्या कुटुंबियांना थोडासा हातभार लावण्याचा प्रयत्न या मदतीतून करण्यात आला आहे.

काही मित्र एकत्र येऊन सामाजिक बांधीलकीतून घेतलेल्या पुढाकारातून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. जर आपण मनात आणलं तर भुकेल्या प्रत्येक माणसाच्या ताटात भाकरी पोचवता येवू शकते हा विश्वास यातून मजबूत झाला. समाजातील अनेक लोकांनी पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात वास्तव्यास असणाऱ्या अशा वंचित, भटक्या तसेच गरजू लोकांना मदतीची मोठी गरज आहे.


शहराच्या उपनगरात भटक्या समाजातील अनेक कुटुंब पालांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न लॉकडाऊनमुळे निर्माण झाला आहे. जोशी, मदारी, बहुरूपी, नंदीवाले, तिरमली या भटक्या जाती जमातींची लोक पालक टाकून वास्तव्य करत आहेत. या कुटुंबियांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. ही कुटुंबे संपूर्ण देशाच्या वेगावेगळ्या भागातून या ठिकाणी वास्तव्यास आलेली आहेत. या जाती जमाती मुख्यतः भिक्षा मागणे, ढोलकी बनविणे, खेळ करणे, नंदीबैल घेऊन घरोघरी भिक्षा मागणे, धातूंच्या अंगठ्या बनविणे झाडू बनविणे अशाप्रकारची कामं करून आपला उदरनिर्वाह करत असतात.

या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक पालाला ५०० रु. ते १००० रु. इतके भाडे प्रतिमहिना आकारले जात आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय देखील नाही. त्यामुळे या लोकांना १ रुपयाला १ हंडा याप्रमाणे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.


या अशा हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असताना या कोरोना महामारीने त्यांच्या पुढे पुन्हा पोटा पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. या लोकांना लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहासाठी सध्याच्या परिस्थितीत घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे या जाती जमातींवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या लोकांना आपल्या मदतीची गरज आहे. जर या परिसरामध्ये या लोकांना आपणाकडून अन्नधान्याची मदत शक्य असेल तर जरूर कळवावे.

असं आवाहन या लोकांना मदत करणाऱ्या जैन साहित्याचे अभ्यासक डॉ.महावीर साबळे, उद्योजक निलेश मताने, नेट सेट संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश देवढे,जागल्या वेब पोर्टलचे संपादक दीपक जाधव, टी. सी. कॉलेज चे प्राध्यापक विनायक लष्कर, डॉक्टर कादीर शेख, निलेश गायकवाड , सचिन रुद्राक्ष, गणेश बोराडे या सर्व मित्रांनी केले असून याच सर्वांनीच या गरजूवंताना मदत केली असून समाजातील दानशूर लोकांनी या कार्यात हातभार लावला तर अधिक चांगलं होईल.

Updated : 17 May 2021 8:00 PM IST
Next Story
Share it
Top