Home > News Update > Pune Curfew: पुण्यात रात्रीची संचारबंदी; काय सुरू, काय बंद?

Pune Curfew: पुण्यात रात्रीची संचारबंदी; काय सुरू, काय बंद?

Pune Curfew: पुण्यात रात्रीची संचारबंदी; काय सुरू, काय बंद?
X

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यातील कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी विविध जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात येत आहे. आज पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील सात दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात शनिवारपासून सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे. आज सकाळी या संदर्भात पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

काय बंद काय सुरु राहणार ?

हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल पुढील 7 दिवसांसाठी बंद

Pmpl पीएमपीएल सेवा ही सात दिवसांसाठी बंद

आठवडा बाजार सात दिवस बंद ठेवले जाणार नाही

लग्न, अंतिम संस्कार सोडून सर्व कार्यक्रम बंद

अत्यावश्यक गोष्टी सोडून सायंकाळी ६:०० ते सकाळी ६:०० सर्व गोष्टी बंद

हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू राहणार

सर्व धार्मिक स्थळे बंद

दिवसा जमाव बंदी.

रात्री संचार बंदी...

उद्याने सकाळी सुरू रहाणार

शाळा, कॉलेज 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार.

परीक्षा वेळेत होणार संचारबंदीच्या काळात खासगी कार्यालयांमधून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंपन्यांनी त्याबाबतचे पत्र दिले असेल तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

Updated : 2 April 2021 9:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top