Home > News Update > अमरावती हिंसाचार देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे एक सुनियोजित षडयंत्र

अमरावती हिंसाचार देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे एक सुनियोजित षडयंत्र

अमरावती हिंसाचार देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे एक सुनियोजित षडयंत्र
X

मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात राज्यातील मुस्मीम बांधवांनी बंदचं शुक्रवारी 12 नोव्हेंबरला बंदचं आवाहन दिलं होतं. या बंद दरम्यान राज्यातील काही शहरांमध्ये हिंसक वळण लागलं आहे. अमरावतीमध्ये आज सकाळी दहा वाजता शहरातील प्रमुख चौकात हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना काहींनी घटनास्थळी उपस्थित पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सध्या दगडफेक सुरू असून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. गर्दी पाहता ग्रामीण भागातूनही शहरात फौजफाटा मागवण्यात आला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर शांत असलेल्या महाराष्ट्रात अशा प्रकारे अचानक हिंसक घटना का घडत आहेत. असा सवाल उपस्थित होत असताना फडणवीस यांनी या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया देताना हे एक सुनियोजित षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले.. अमरावतीमधील एकूणच घटनाक्रम अस्वस्थ करणारा आहे. पहिल्यांदा सर्वांना विनंती करतो की अमरावतीत शांतता प्रस्थापित करावी. कुणीही हिंसाचार करू नये. पण ज्या प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रात निघाले, हे एक सुनियोजित षडयंत्र वाटतंय. त्रिपुरामध्ये जी घटनाच घडली नाही, त्या घटनेवर अशा प्रकारचे मोर्चे काढणं अत्यंत चुकीचं आहे.

त्रिपुरात असं काही घडलंच नाही...

"कोणतीही मशीद त्रिपुरामध्ये जाळण्यातच आलेली नाही. असं असताना त्या अफवांवर महाराष्ट्रात मोर्चे काढायचे आणि त्यावर हिंदूंची दुकानं जाळायची हे देखील योग्य नाही. सरकारने यावर कडक कारवाई केली पाहिजे. सरकारी पक्षाचे नेते स्टेजवर जाऊन भडकवणारी भाषणं करणार असतील, तर या दंगलींची जबाबदारी सरकारवर येणार आहे. त्यामुळे कुणीही महाराष्ट्रात दंगल करू नये आणि अशा प्रकारे मोर्चे काढून विनाकारण हिंदूंची दुकानं टार्गेट करणं हे देखील बंद झालं पाहिजे आणि दोन्ही समाजांनी शांतता पाळली पाहिजे.

त्रिपुरात मशीद जाळली गेली नाही...

त्रिपुरा सरकार आणि त्रिपुरा पोलिसांनी स्वत: जी मशीद जाळली होती म्हणून ही सगळी आंदोलनं होत आहेत, त्या मशिदीचे फोटो जारी केले आहेत. शिवाय सोशल मीडियावर कशा प्रकारे हे खोटे फोटो टाकण्यात आले हे देखील प्रकाशित करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर पेटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित लोकांवर कारवाई देखील केली आहे.

दरम्यान पोलिसांकडून मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्यानंतर पाण्याचा मारा करावा लागला. अमरावतीत चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. शांतता राखणे गरजेचे आहे. आम्ही कुठल्याही दंगलीचे समर्थन करत नाही. सर्वांनी शांतता पाळावी, असे आवाहन फडणवीस यांनी केलं आहे. सध्या अमरावती शहरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

Updated : 13 Nov 2021 9:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top