Home > News Update > बँकांचे विलीनीकरण: जागतिक भांडवल आणि भारतीय मोठ्या कॉर्पोरेट्स साठी !

बँकांचे विलीनीकरण: जागतिक भांडवल आणि भारतीय मोठ्या कॉर्पोरेट्स साठी !

बँकांचे विलीनीकरण: जागतिक भांडवल आणि भारतीय मोठ्या कॉर्पोरेट्स साठी !
X

लेख थोडा मोठा आहे पण ज्यांना या विषयात रस आहे त्यांनी जरूर वाचावा; महत्वाचे मुद्दे:

(१) मॅकेन्झीच्या रिपोर्ट प्रमाणे एशिया खंडातील बँकांची नफा कमवण्याची क्षमता दर वर्षा गणिक कमी होत आहे. यावर मेनस्ट्रीमचा उपाय म्हणजे बँकांचा आकार वाढवणे आणि तंत्रज्ञानात गुंतवणूक करणे. हाच दृष्टिकोन भारतातील धोरणकर्त्यांवर अमल करत आहे.

(२) इ अँड वाय च्या रिपोर्ट प्रमाणे गेल्या २००८ नंतर सर्वच देशात बँकांच्या विलीनीकरणाची गती वाढून मोठ्या बँका अधिक मोठ्या होत आहेत. अमेरिकेत एकूण बँकिंग उद्योगाच्या अर्ध्याहून अधिक धंदा फक्त ४ मोठ्या बँका करतात.

(३) परकीय गुंतवणूकदारांना भारतीय बँकांत गुंतवणूक करायची इच्छा आहे. पण मार्केट कॅपिटलायझेशनच्या निकषावर भारतीय बँका एकदम पिग्मी आहेत. आपल्या सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजारमूल्य ३२ बिलियन्स डॉलर्स आहे. तर जगातील सर्वात जास्त बाजारमूल्य असणाऱ्या जे पी मॉर्गनचे ३६४ बिलियन्स डॉलर्स.

(४) बँकांच्या विलीनीकरणाकडे गेल्या पाच वर्षातील कॉर्पोरट सेक्टरशी संबंधित इतर निर्णयाच्या शृंखलेतील एक कडी म्हणून बघायला हवे: दिवाळखोरी कायदा, एफ डी आय, कोर्पोरेटना आयकरात घसघशीत सूट इत्यादी.

(५) बँकिंग क्षेत्र अर्थ व्यस्वस्थेच्या केंद्रस्थानी असते. रिअल इकॉनॉमीला विशिष्ट आकार द्यायचा असेल तर बँकिंग क्षेत्राला हत्यार म्हणून वापरले जाते. भारतातील अर्थव्यवस्था भविष्यकाळात अधिकाधिक प्रमाणात मोठ्या कॉर्पोरेट्सच्या हातात जाणार आहे. त्यासाठी चाललेल्या व्यूहरचनेचा एक भाग म्हणून बँकांच्या विलीनीकरांकडे पहावे लागेल.

Updated : 19 Oct 2019 7:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top