Home > News Update > मोठी बातमी : 2 केंद्रीय मंत्री, 3 विरोधी नेते आणि काही पत्रकारांवर पाळत? मोबाईल हॅक झाल्याची शक्यता

मोठी बातमी : 2 केंद्रीय मंत्री, 3 विरोधी नेते आणि काही पत्रकारांवर पाळत? मोबाईल हॅक झाल्याची शक्यता

2 केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवली गेली होती, असा गौप्यस्फोट करणारा INVESTIGATIVE REPORT प्रसिद्ध झाला आहे. द वायर सह जगभरातील 16 वृत्त माध्यमांनी हा रिपोर्ट तयार केला आहे.

मोठी बातमी :  2 केंद्रीय मंत्री, 3 विरोधी नेते आणि काही पत्रकारांवर पाळत?  मोबाईल हॅक झाल्याची शक्यता
X

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्शवभूमीवर द वायर आणि जगभरातील काही मोठ्या माध्यमांनी मिळून एक Investigative Report प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टनुसार इस्त्रायलमधील हेरगिरी करणाऱ्या एनएसओ या कंपनीने पेगॅसस सॉफ्टवेअरद्वारे भारतासह जगभरातील काही महत्त्वाच्या लोकांवर पाळत ठेवल्याची दाट शक्यता आहे. या कंपनीचा काही डाटा लीक झाला आहे. ज्यामध्ये जगभरातील काही व्यक्तींचे फोन नंबर मिळाले आहेत. यामध्ये काही महत्त्वाच्या लोकांचे फोन नंबरही आहेत. भारतातील 300 फोन नंबर या यादीमध्ये आढळले आहेत. यात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील 2 मंत्री, एक न्यायाधीश, काही पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, मानवी हक्क कार्यकर्ते यांचा समावेश आहे, Forbidden Stories and Amnesty International या पॅरिसमधील एका एऩजीओने हे नंबर या माध्यमांना दिले आहेत.

या शोधोमोहीमेत काम करणाऱ्या पत्रकारांच्या माहितीनुसार 2017-2019 या काळात या मोबाईल क्रमांकांवर पाळत ठेवली गेली होती. जगभरातील देशांना गुप्तहेर तंत्रज्ञान पुरवणाऱ्या एनएसओ कंपनीने सांगितले आहे त्यांची कंपनी जगभरात केवळ अधिकृत सरकारांना अशा पुरवते. प्रोजेक्ट पिगॅसस नावाने राबवलेल्या गेलेल्या या शोधमोहीमेत 37 मोबाईलची फॉरेन्सिक चाचणी केली गेली. यामध्ये 10 भारतीय मोबाईल क्रमांक होते. पण पिगॅसिस तंत्रज्ञानामुळे ज्या फोन नंबरची हेरगिरी केली गेली. ते हॅक करुन त्यात काही बदल केले गेले का याबाबत ठोस निष्कर्ष काढता आलेला नाही, असेही वायरने स्पष्ट केले आहे.

गुप्तहेर संस्थेचे स्पष्टीकरण

पिगॅसस सॉफ्टवेअरची विक्री करणाऱ्या 'एनएसओ' या गुप्तहेर संस्थेने या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. या संस्थेने सांगितले आहे की त्यांचे ग्राहक हे अत्यंत मर्यादित स्वरुपात आहेत. आमचे ग्राहक म्हणजे अधिकृत सरकारे आहेत. या ग्राहकांची संख्या ३६ आहे, असेही कंपनीने सांगितले आहे. पण आपल्या ग्राहकांची ओळख आम्ही जाहीर करत नाही, असे सांगत कंपनीने नकार दिला आहे. कंपनीच्याया स्पष्टीकरणामुळे The wire आणि इतर वृत्त माध्यमांनी जो रिपोर्ट सादर केला आहे, त्यात भारतासह इतर देशातील कोणतीही खासगी संस्था मोबाईलमधील या घुसखोरी मागे असण्याची शक्यता दिसत नाही.

'पेगॅसस' तंत्रज्ञान म्हणजे काय?

मोबाईल नंबर हॅक करण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. हे सॉफ्टवेअर इस्त्रायलमधील हेरगिरी करणारी NOS या कंपनीने तयार केले आहे. व्हॉटस अॅणपने या कंपनीवर याआधीच हेरगिरीचा आरोप करत कंपनीला कोर्टात खेचले होते. तसेच या तंत्रज्ञानाच्या आधारे भारतातील काही लोकांच्या फोनवर पाळत ठेवली गेल्याचा दावाही वॉट्सअपने केला होता.

हे नंबर कुणाचे?

हे नंबर कुणाचे आहेत, याची माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आलेली नाही. जोपर्यंत हे नंबर कोण वापरत होते आणि कशापद्धतीने हेरगिरी केली केली याची माहिती हाती येत नाही तोपर्यंत ही नावे आम्ही प्रसिद्ध करणार नाही, असेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे,

Updated : 19 July 2021 4:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top