Home > News Update > तांबे निर्यात करणारा भारत आयातदार का झाला? प्रीतम मुंडे यांचा सवाल

तांबे निर्यात करणारा भारत आयातदार का झाला? प्रीतम मुंडे यांचा सवाल

तांबे निर्यात करणारा भारत आयातदार का झाला? प्रीतम मुंडे यांचा सवाल
X

देशात मोठ्या प्रमाणावर तांब्याचे उत्पादन होते. त्यातून एके काळी देश खाण व्यवसायातून तांब्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात करीत होता. मात्र सध्या ही निर्यात घसरली आहे. याबाबत भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी सवाल उपस्थित केला.

संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान 2021-22 मध्ये तांबे उत्पादनात घट झाली होती. मात्र 2022-23 मध्ये तांबे उत्पादन वाढले. परंतू 2017-18 मध्ये भारत हा तांब्याचा निर्यातदार देश होता. मात्र सध्या तांबे उत्पादनात झालेल्या घटीचा परिणाम म्हणून तांबे आयात करावे लागत आहे. त्यामुळे हे घटलेले उत्पादन का घटले? याविषयी खासदार प्रीतम मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला.

यावर खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी उत्तर देतांना सांगितले की, तामिळनाडूत आम्ही खाणकाम सुरु करण्याचा प्रयत्न केला. तसेच ओडिसामध्येही खाणकाम वाढवले आहे. त्यामुळे आम्ही HCL साठीचे बजेट वाढवले आहे. त्यामुळे कायदा, नियम यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांनी सांगितलेली सुधारणा करण्याचा प्रयत्न करू, असं प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

Updated : 8 Feb 2023 12:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top