Home > News Update > पंतप्रधानांच्या सुरक्षा त्रुटीच्या कारस्थानाच्या चौकशीत हस्तक्षेप; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करा, भाजपाची मागणी

पंतप्रधानांच्या सुरक्षा त्रुटीच्या कारस्थानाच्या चौकशीत हस्तक्षेप; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करा, भाजपाची मागणी

पंजाब दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य सुरक्षेत त्रुटी असल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यावरून उच्चस्तरावर चौकशी सुरू आहे. त्यातच काँग्रेसकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारस्थानाच्या चौकशीत हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

पंतप्रधानांच्या सुरक्षा त्रुटीच्या कारस्थानाच्या चौकशीत हस्तक्षेप; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करा, भाजपाची मागणी
X

बुधवारी पंतप्रधान पंजाब दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा फिरोजपुरकडे जात असताना उड्डाणपुलावर अडकून पडला. त्यामुळे पंजाब सरकारने पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी ठेवल्याचा आरोप भाजपाने केला. त्यावर उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींच्या सुरक्षेत झालेल्या गंभीर व धोकादायक गफलतीमध्ये देशाच्या गृहमंत्र्यांचा हात असल्याची शंका व्यक्त केली. त्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.

पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या बाबतीत जी घटना घडली ती अत्यंत गंभीर होती. त्यात पंतप्रधानांच्या हत्येचे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त होत आहे. तर देशाच्या सुरक्षिततेविषयी अत्यंत गंभीर विषयावर सर्वोच्च पातळीवर चौकशी सुरू आहे. त्यात नाना पटोले यांनी ही घटना नौटंकी असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली. तसेच या घटनेमागे देशाच्या गृहमंत्र्यांचा हात अशल्याचा संशय जाहीरपणे व्यक्त केला. हा तपासावर प्रभाव टाकण्याचा व तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न आहे. त्याचा मी निषेध व्यक्त करतो, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पटोले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तर पंतप्रधानांच्या हत्येच्या प्रयत्नाबद्दल पटोले यांच्याकडे काही माहिती आहे का? याचा तपास करण्याचीही मागणी पाटील यांनी केली.

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याच्या प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय चौकशी समितीकडून सुरू असताना देशाच्या गृहमंत्र्याबद्दल शंका व्यक्त करून पटोले यांनी तपास प्रभावित केल्याचा व तपासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी जनतेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश भाजपा कार्यकर्त्यांना दिले आहेत, असे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.

Updated : 8 Jan 2022 3:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top